Uncategorized

५ हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले , माळशिरस पंचायत समिती मधील वरिष्ठ सहाय्यक ACB च्या जाळ्यात

माळशिरस | प्रतिनिधी – Talk18 मराठी:

माळशिरस पंचायत समितीतील वरिष्ठ सहाय्यक सुंदरराव नागटिळक (वय 56) यांना पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) पथकाने रंगेहात पकडल्याची धक्कादायक घटना आज दुपारी उघडकीस आली. या कारवाईमुळे पंचायत समिती परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांनी धर्मपुरी येथे सभा मंडपाचे काम पूर्ण केले होते. काम पूर्ण झाल्यानंतर संबंधित बिल सोलापूर कार्यालयात दाखल करण्यात आले होते. पुढील प्रशासकीय प्रक्रियेनुसार ते बिल माळशिरस पंचायत समितीकडे आले. काम पूर्ण झाल्याचा दाखला गटविकास अधिकारी (BDO) यांच्याकडून मिळवून देण्यासाठी वरिष्ठ सहाय्यक सुंदरराव नागटिळक यांनी तक्रारदाराकडे तब्बल 10 हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे.

या मागणीबाबत तक्रारदारांनी पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी करून आज दुपारी सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास पंचायत समिती कार्यालयात सापळा रचण्यात आला. तडजोडीअंती पाच हजार रुपये स्वीकारताना नागटिळक यांना ACB पथकाने रंगेहात पकडले.

या प्रकरणात गटविकास अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात आली असता, प्राथमिक पडताळणीत त्यांच्याविरोधात कोणतीही बाब आढळून आली नसल्याचे समजते. आरोपीविरुद्ध पुढील गुन्हा सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे वर्ग करण्यात येणार असून, अधिक तपास सुरू आहे.

ही कारवाई पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे, लेडीज पोलीस कॉन्स्टेबल माकर, पोलीस कॉन्स्टेबल तावरे, कुमकर व चालक दिवेकर यांच्या पथकाने केली.

या घटनेमुळे पंचायत समिती कार्यालयातील कामकाजाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button