Uncategorizedमहाराष्ट्र

माळीनगर पत्रकार संघाला नवा चेहरा; अध्यक्षपदी रितेश पांढरे, सचिवपदी गोपाळ लावंड यांची पुनश्च निवड

Talk18 मराठी /आण्णा भोसले :

माळीनगर येथील माळीनगर पत्रकार संघाच्या नूतन अध्यक्षपदी दैनिक पुण्यनगरीचे माळीनगर प्रतिनिधी रितेश पांढरे यांची तर सचिवपदी गोपाळ लावंड यांची एकमताने पुनश्च निवड करण्यात आली आहे. ही निवड पुढील दोन वर्षांच्या कार्यकाळासाठी करण्यात आली आहे.

माळीनगर पत्रकार संघाचे संस्थापक व ज्येष्ठ पत्रकार मिलिंद गिरमे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच संघाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत पत्रकार संघाच्या विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी विद्यमान अध्यक्ष गणेश करडे यांचा कार्यकाळ संपल्याने नव्या अध्यक्षपदासाठी निवड प्रक्रिया राबवण्यात आली.

यामध्ये गेली २० वर्षे पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत असलेले अनुभवी पत्रकार रितेश पांढरे यांची सर्वानुमते अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तसेच संघाचे विद्यमान सचिव गोपाळ लावंड यांच्या कार्याची दखल घेत त्यांना पुन्हा एकदा सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली.

या निवड प्रक्रियेदरम्यान मावळते अध्यक्ष गणेश करडे, तसेच संघाचे सदस्य प्रदीप बोरावके यांची उपस्थिती होती.

या निवडीनंतर दि. सासवड माळी शुगर फॅक्टरीचे चेअरमन राजेंद्र गिरमे, मॅनेजिंग डायरेक्टर गणेश इनामके व संचालक मंडळ, शुगरकेन सोसायटीचे चेअरमन अमोल ताम्हाणे, व्हा. चेअरमन कपिल भोंगळे, सासवड माळी एज्युकेशन सोसायटीचे व्हा. चेअरमन नितीन इनामके, सेक्रेटरी अजय गिरमे, महात्मा फुले पतसंस्थेचे व्हा. चेअरमन महादेवराव एकतपुंरे, माळीनगर मल्टीस्टेट सोसायटीचे चेअरमन अमोल गिरमे, गहिनीनाथ अर्बन बँकेचे चेअरमन शिरीष फडे, दि. मॉडेल हायस्कूलचे प्राचार्य कलाप्पा बिराजदार यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी व मान्यवरांनी रितेश पांढरे व गोपाळ लावंड यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

पत्रकार संघाच्या माध्यमातून पत्रकारांच्या हक्कांसाठी आणि सामाजिक प्रश्नांवर प्रभावी भूमिका घेऊ, असा विश्वास नूतन अध्यक्ष रितेश पांढरे यांनी यावेळी व्यक्त केला.

👉 अधिक बातम्यांसाठी पाहत राहा – Talk18 मराठी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button