Uncategorized

28 डिसेंबरला अकलूजमध्ये काँग्रेसचा उत्सव; गिरीश शेटे संपर्क कार्यालयाचे उद्घाटन

Talk18 मराठी आण्णा भोसले | अकलूज :राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त अकलूजमध्ये भव्य कार्यक्रमभारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त रविवार, दिनांक 28 डिसेंबर 2025 रोजी सकाळी ठीक 11 वाजता अकलूज येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या प्रसंगी गांधी चौक – माळशिरस रोड, अकलूज (शेटे व्यापारी संकुल) येथे राष्ट्रीय काँग्रेस कमिटी माळशिरस तालुका अध्यक्ष गिरीश प्रभाकर शेटे यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे. उद्घाटनासोबतच मिठाई वाटप व विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाला काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व काँग्रेसप्रेमी नागरिकांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन माळशिरस तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष गिरीश प्रभाकर शेटे यांनी केले आहे.

काँग्रेस पक्षाच्या विचारधारेचा प्रसार, संघटन बळकटी आणि कार्यकर्त्यांमधील उत्साह वाढवण्यासाठी हा कार्यक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

— Talk18 मराठी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button