
२७ सप्टेंबर २०२६ वार: रविवार
Talk18 मराठी प्रतिनिधी : शेंडेवाडी विकास सोसायटीच्या सभासदांना यंदाही १५ टक्के लाभांश (डिव्हिडंड) देण्याची घोषणा करण्यात आली आहे. माळशिरस तालुक्याचे आमदार उत्तमराव जानकर व पंचायत समिती सदस्य मधुकर भाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेने सलग पाच वर्षे १५ टक्के लाभांश वाटपाची परंपरा कायम ठेवली आहे.
संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने सभासदांना लाभांश वाटप करण्यात आले. यावेळी संस्थेच्या मागील वर्षातील कामकाजाचा आढावा घेण्यात आला. तसेच सभासदांचे आर्थिक हित, संस्थेची प्रगती आणि भविष्यातील नियोजनाबाबत चर्चा करण्यात आली.
शेंडेवाडी विकास सोसायटीच्या माध्यमातून सभासदांच्या आर्थिक हिताला प्राधान्य देत विविध उपक्रम राबविले जात आहेत. सलग पाच वर्षे १५ टक्के लाभांशाचे सातत्य राखल्यामुळे सभासदांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
संस्थेचे मार्गदर्शक पंचायत समिती सदस्य मधुकर भाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लाभांश वाटपाची ही परंपरा सुरू असल्याने माळशिरस तालुका व फोंडशिरस परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे. संस्थेच्या आर्थिक वाटचालीबद्दल सभासद व परिसरातील नागरिकांकडून शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.


