Uncategorizedअकलूजआरोग्यआर्थिकक्रीडादेश-विदेशमहाराष्ट्रविशेषशैक्षणिकसंपादकीयसामाजिक

माळशिरसच्या प्रकल्पाधिकारी सौ.आसमाँ आतार-मणेरी यांची राजपत्रित अधिकारी संघटनेच्या सह अध्यक्षपदी ऐतिहासिक निवड

28 सप्टेंबर l सोमवार

Talk18 मराठी माळशिरस प्रतिनिधी :

महिला व बालविकास विभाग राजपत्रित अधिकारी संघटना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या सार्वसाधारण निवडणूक २०२६ मध्ये माळशिरसच्या महिला व बालविकास प्रकल्पाधिकारी सौ. आसमाँ कमाल आतार-मणेरी यांची सहअध्यक्षपदी प्रचंड मतांनी निवड झाली. संघटनेच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला राजपत्रित अधिकाऱ्याची सहअध्यक्ष या महत्त्वपूर्ण पदावर निवड झाल्याने त्यांच्या निवडीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

ही निवडणूक प्रक्रिया जिल्हा परिषद, शरदचंद्र पवार सभागृह येथे २७ सप्टेंबर रोजी पार पडली. सुमारे ४५० राजपत्रित अधिकारी संघटनेचे सदस्य असून, त्यापैकी सुमारे २३० अधिकारी उपस्थित होते. या निवडणुकीत ६१ टक्के मतदान झाले. चुरशीच्या वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पडली आणि २७ सप्टेंबर रोजी सायंकाळी निकाल जाहीर करण्यात आला.

या निवडणुकीत श्री. संतोष भोसले यांच्या अध्यक्षतेखालील ‘सक्षम पॅनल’चे सर्व ११ उमेदवार विजयी झाले. पॅनलने ११-० असा दणदणीत विजय मिळवत संघटनेच्या निवडणुकीत आपले वर्चस्व सिद्ध केले.

या निवडणुकीत माळशिरसच्या प्रकल्पाधिकारी सौ. आसमाँ कमाल आतार-मणेरी यांचा प्रचंड मतांनी विजय झाला. विशेष म्हणजे, महिला व बालविकास विभागाच्या राजपत्रित अधिकारी संघटनेच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिला राजपत्रित अधिकाऱ्याला सहअध्यक्षासारख्या महत्त्वपूर्ण पदाची जबाबदारी मिळाली आहे. यापूर्वी महिला अधिकाऱ्यांना संघटनेमध्ये एवढ्या मोठ्या पदावर प्रतिनिधित्व मिळाले नव्हते.

सहअध्यक्ष म्हणून सौ. आतार-मणेरी यांच्यावर महिला व बालविकास विभागातील राजपत्रित अधिकारी वर्गाच्या विविध प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फोडणे, अधिकारी वर्गामध्ये समन्वय साधणे आणि संघटनेच्या माध्यमातून अधिकारी हितासाठी काम करण्याची महत्त्वाची जबाबदारी असणार आहे.

त्यांच्या या ऐतिहासिक निवडीमुळे माळशिरस तालुक्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून, महिला व बालविकास विभागातील अधिकारी-कर्मचारी तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

सौ. आसमाँ कमाल आतार-मणेरी यांच्या प्रशासकीय अनुभवाला आणि कार्यक्षमतेला संघटनेच्या नव्या जबाबदारीची जोड मिळाल्याने त्यांच्या नेतृत्वातून संघटनेला नवी दिशा आणि महिला अधिकाऱ्यांना प्रभावी प्रतिनिधित्व मिळेल, असा विश्वास व्यक्त होत आहे. त्यांच्या ऐतिहासिक निवडीबद्दल सर्व स्तरांतून मनःपूर्वक अभिनंदन व पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात येत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button