
Talk18 मराठी l ९ सप्टेंबर बुधवार :
पिलीव | प्रतिनिधी
माळशिरस तालुक्यातील पिलीव येथे कृषी व पशुसंवर्धनचे माजी सभापती संग्रामसिंह जहागीरदार यांच्या मार्गदर्शनाखाली संग्राम राजे प्रतिष्ठानच्या वतीने गुरुवार, दि. १० सप्टेंबर २०२६ रोजी आर्वे मैदान येथे भव्य दहीहंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात गोविंदा पथकांकडून सादर होणारे मानवी मनोरे, दहीहंडी फोडण्याचा थरार तसेच ढोल-ताशांचा निनाद यामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण होणार आहे.
भगवान श्रीकृष्णाच्या बाललीलांशी संबंधित असलेली दहीहंडीची परंपरा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक उत्सवाचा अविभाज्य भाग आहे. गोविंदा पथकांकडून मानवी मनोरे रचून उंचावर बांधलेली हंडी फोडण्याची ही परंपरा उत्साह, एकजूट आणि सांघिक भावनेचे प्रतीक मानली जाते.
पिलीव व परिसरात आयोजित करण्यात आलेल्या या भव्य दहीहंडी सोहळ्यास नागरिक, युवक तसेच विविध गोविंदा पथकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन संग्राम राजे प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.


