Uncategorized
पांडुरंग तात्या वाघमोडे यांचा तात्या वाघमोडे यांचा आज अभिष्टचिंतन सोहळा; मान्यवरांसह हितचिंतकांची उपस्थिती
Talk18 मराठी l ९ सप्टेंबर बुधवार :
माळशिरस प्रतिनिधी : जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य तथा लोकराज फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पांडुरंग तात्या वाघमोडे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन आज, बुधवार दि. ९ सप्टेंबर २०२६ रोजी करण्यात आले आहे.
हा अभिष्टचिंतन सोहळा सायंकाळी ६ वाजता, पांडुरंग तात्या वाघमोडे निवासस्थान, ६० फाटा, माळशिरस, जि. सोलापूर येथे आयोजित करण्यात आला आहे.
सामाजिक, राजकीय व सार्वजनिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या पांडुरंग तात्या वाघमोडे यांना शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते, मित्रपरिवार व हितचिंतक उपस्थित राहणार आहेत.
या सोहळ्यानिमित्त त्यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि भावी सामाजिक वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.


