Uncategorizedअकलूजआरोग्यआर्थिकक्रीडादेश-विदेशमहाराष्ट्रविशेषशैक्षणिक

सोमवारी होणार महावितरणचा सोक्षमोक्ष! वाढत्या लोडशेडिंगवर आमदार जानकर आक्रमक; “अंधारातच काय, पण दिवसा सुद्धा लाईट चालू राहणार!”

Talk18 मराठी वेळापूर | गुरुवार, दि. १० सप्टेंबर २०२६ : माळशिरस तालुक्यात वाढत चाललेल्या लोडशेडिंगच्या प्रश्नावर आता आमदार उत्तमराव जानकर आक्रमक झाले आहेत. वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, अनियमित भारनियमन आणि शेतीसाठी आवश्यक वेळी वीज उपलब्ध होत नसल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये मोठा संताप निर्माण झाला आहे.

महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना वारंवार सूचना करूनही माळशिरस तालुक्यातील विजेचा प्रश्न सुटता सुटेना. लोकप्रतिनिधींनी सूचना करूनही शेतकऱ्यांना अखंडित व सुरळीत वीजपुरवठा मिळत नसल्याने आता महावितरणच्या कारभाराचा जाब थेट अधिकाऱ्यांना विचारला जाणार आहे.

*“अंधारातच काय, पण दिवसा सुद्धा लाईट चालू राहणार!”* असा आक्रमक इशारा देत आमदार उत्तमराव जानकर यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना वीजपुरवठ्याचा प्रश्न तातडीने सोडवण्याचे आवाहन केले आहे.

*सोमवारी महावितरण कार्यालयावर धडक*

सोमवार, दि. १४ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता अकलूज येथील महावितरणच्या कार्यकारी अभियंता कार्यालयासमोर माळशिरस तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात येणार आहे.

वीजपुरवठ्याच्या समस्येमुळे शेतीचे नियोजन कोलमडत असून पिकांना पाणी देण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे आता केवळ आश्वासन नको, तर अखंडित आणि सुरळीत वीजपुरवठ्याचा ठोस निर्णय हवा, अशी भूमिका शेतकरी बांधवांकडून घेतली जात आहे.

*शेतकऱ्यांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन*

माळशिरस तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांनी सोमवार, दि. १४ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता अकलूज येथील महावितरणच्या कार्यकारी अभियंता कार्यालयासमोर मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

*वाढत्या लोडशेडिंगवरून आता महावितरण आणि आमदार उत्तमराव जानकर यांच्यातील संघर्ष कोणत्या टप्प्यावर पोहोचतो, याकडे संपूर्ण माळशिरस तालुक्याचे लक्ष लागले आहे.*

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button