
Talk18 मराठी l 6 सप्टेंबर रविवार :
सोलापूर प्रतिनिधी :
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) सोलापूर जिल्ह्याची महत्त्वपूर्ण जिल्हा बैठक रविवार, दि. १३ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १२.३० वाजता वैराग (ता. बार्शी) येथील मातोश्री मंगल कार्यालय, मोहोळ चौक, सोलापूर रोड, वैराग येथे आयोजित करण्यात आली आहे.
रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय समाजकल्याण मंत्री रामदास आठवले यांच्या आदेशाने आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष लोकनेते राजाभाऊ सरवदे यांच्या सूचनेनुसार या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हाध्यक्ष सोमनाथ भोसले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे.
बैठकीस महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे, प्रदेश संघटक सुनीलजी सर्वगोड, प्रदेश संघटक बापूसाहेब जगताप, प्रदेश संघटक नंदकुमार केगांर तसेच पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस जितेंद्र बनसोडे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
या बैठकीत नवीन सोलापूर जिल्हा कार्यकारिणीची निवड, ३ ऑक्टोबर २०२६ रोजी पक्षाचा वर्धापनदिन साजरा करण्याचे नियोजन, तसेच १४ ऑक्टोबर २०२६ रोजी कोल्हापूर येथे होणाऱ्या बौद्ध धम्म परिषदेच्या नियोजनाबाबत चर्चा करण्यात येणार आहे. याशिवाय आयत्या वेळच्या विषयांवरही चर्चा होणार आहे.
सोलापूर जिल्ह्यातील राज्य कार्यकारिणी, पश्चिम महाराष्ट्र पदाधिकारी, जिल्हा कार्यकारिणी, तालुका अध्यक्ष व कार्यकारिणी पदाधिकारी तसेच सोलापूर शहर कार्यकारिणीतील पदाधिकारी आणि रिपाइंच्या सर्व कार्यकर्त्यांनी या बैठकीस मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष सोमनाथ भोसले आणि जिल्हा सरचिटणीस शामसुंदर (रवी) गायकवाड यांनी केले आहे.


