
2 सप्टेंबर l शनिवार
Talk18 मराठी माळशिरस प्रतिनिधी :
श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त कण्हेर (ता. माळशिरस) येथे शनिवार, दि. ५ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ३ वाजता भव्य कुस्त्यांच्या जंगी मैदानाचे आयोजन करण्यात आले आहे. या कुस्ती मैदानासाठी परिसरातील नामांकित मल्लांसह विविध गटांतील कुस्तीपटूंच्या लढती रंगणार आहेत.
या कुस्ती मैदानाचे आयोजन जिल्हा परिषद सदस्य श्री. गौतम (आबा) माने-पाटील यांच्या पुढाकारातून करण्यात आले असून, समस्त ग्रामस्थ व ग्रामपंचायत, कण्हेर यांच्या संयोजनातून हा कुस्ती सोहळा पार पडणार आहे.
कन्हेरच्या ऐतिहासिक मैदानात विविध वजनगटांमध्ये मल्लांच्या कुस्त्या होणार असून, विजेत्या मल्लांना रोख पारितोषिकांसह मान-सन्मान दिला जाणार आहे. त्यामुळे कुस्तीप्रेमींसाठी हा सोहळा विशेष आकर्षण ठरणार आहे.
या त्यासाठी राज्याचे कृषिमंत्री दत्तामामा भरणे, माळशिरस तालुक्याचे आमदार उत्तमराव जानकर, जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार गोपीचंद पडळकर, विधान परिषदेचे माजी आमदार रामहरी आप्पा रुपनर, करमाळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार नारायण आबा पाटील, माढा विधानसभेचे आमदार अभिजीत आबा पाटील, सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबासाहेब देशमुख, या मान्यवरांसह तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार आहे.
कण्हेर येथील कुस्ती मैदानात महाराष्ट्राच्या विविध भागांतून मल्ल सहभागी होणार असल्याने चुरशीच्या आणि रंगतदार कुस्त्या पाहण्याची संधी परिसरातील कुस्तीप्रेमींना मिळणार आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कुस्ती मैदानाचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.


