Uncategorizedअकलूजआरोग्यआर्थिकक्रीडादेश-विदेशमहाराष्ट्रविशेषशैक्षणिकसंपादकीयसामाजिक

डॉ. राजेंद्र रुपनवर यांना न्याय द्या; दोषींवर कठोर कारवाई करा — पै.कालिदास रुपनवर

2 सप्टेंबर बुधवार :

Talk18 मराठी नातेपुते प्रतिनिधी :

: डॉ. संपदा मुंडे यांच्याशी संबंधित प्रकरणाची चर्चा आणि त्यातून निर्माण झालेले प्रश्न अद्याप ताजे असतानाच डॉ. राजेंद्र प्रसाद रुपनवर यांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आल्याने आरोग्य क्षेत्रासह सर्वसामान्यांमध्येही चिंता व्यक्त होत आहे.

या पार्श्वभूमीवर डॉ. राजेंद्र प्रसाद रुपनवर यांच्या मृत्यूची सखोल, निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी करण्यात यावी. तसेच त्यांच्या मृत्यूला कोणी जबाबदार असल्याचे तपासात निष्पन्न झाल्यास संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी युवा नेते पै.कालिदास रुपनवर यांनी Talk18 मराठीशी बोलताना व्यक्त केली.

डॉ. राजेंद्र प्रसाद रुपनवर यांच्या आत्महत्येमागील नेमकी कारणे काय होती? त्यांच्यावर कोणता दबाव होता का? त्यांच्या मृत्यूपूर्वी घडलेल्या घटनांचा आणि संबंधित व्यक्तींचा तपास करण्यात आला आहे का? असे अनेक प्रश्न या घटनेनंतर उपस्थित होत आहेत.

“डॉ. राजेंद्र प्रसाद रुपनवर यांना न्याय मिळालाच पाहिजे. या प्रकरणातील प्रत्येक बाबीची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे. दोषी आढळणाऱ्यांवर कोणताही मुलाहिजा न ठेवता कठोर कारवाई करण्यात यावी,” अशी भूमिका कालिदास रुपनवर यांनी Talk18 मराठीशी प्रतिक्रिया व्यक्त करताना मांडली.

दरम्यान, डॉ. संपदा मुंडे प्रकरण आणि डॉ. राजेंद्र प्रसाद रुपनवर यांच्या आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर आरोग्य क्षेत्रातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वातावरणाबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. या पार्श्वभूमीवर संबंधित प्रकरणांची वस्तुनिष्ठ चौकशी होऊन सत्य परिस्थिती जनतेसमोर यावी, अशी अपेक्षाही कालिदास रुपनवर यांनी व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button