
Talk18 मराठी प्रतिनिधी l बुधवार 12 ऑगस्ट 2026 :
आटपाडी तालुक्यातील बनपुरी येथील आणि सध्या माळशिरस तालुक्यातील काळमवाडी येथे मामाच्या गावी वास्तव्यास असलेल्या महेश मारुती साळुंखे (वय २४) या युवकाने सुळेवाडी घाटातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना आज घडली.

घटनेची माहिती मिळताच पिलीव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी माळशिरस येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला.
महेश साळुंखे हा गेल्या काही दिवसांपासून काळमवाडी येथे आपल्या मामाच्या गावी राहत होता. त्याने हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेमुळे काळमवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
या घटनेचा पुढील तपास पिलीव आऊट पोस्टचे हवालदार शंकर मरळे करीत आहेत.
Talk18 मराठी | स्थानिक बातम्या, आपल्या परिसराचा आवाज


