Uncategorized

यशवंत सेनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी प्रकाश हनुमंत वाघमोडे यांची नियुक्ती

Talk18 मराठी l बुधवार 12 ऑगस्ट :

माळशिरस : यशवंत सेना, महाराष्ट्र राज्यच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी प्रकाश हनुमंत वाघमोडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीचे अधिकृत पत्र ८ ऑगस्ट २०२६ रोजी प्रदान करण्यात आले.

यशवंत सेना महाराष्ट्र राज्यचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री बाळासाहेब दोडतले यांच्या नेतृत्वाखाली, तसेच राष्ट्रीय उपाध्यक्ष आण्णासाहेब रुपनवर आणि राष्ट्रीय महासचिव नितीनदादा धायगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाश वाघमोडे यांच्यावर सोलापूर जिल्ह्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

सोलापूर जिल्ह्यात पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करणे, पक्षाचे ध्येय-धोरण व विचारधारा सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविणे आणि संघटनेला तळागाळापर्यंत विस्तार देणे, या प्रमुख जबाबदाऱ्या प्रकाश वाघमोडे यांच्यावर सोपविण्यात आल्या आहेत.

नियुक्तीपत्रातून त्यांच्याकडे सोपविण्यात आलेली जबाबदारी प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि प्रभावीपणे पार पाडतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

प्रकाश वाघमोडे यांच्या नियुक्तीचे वृत्त समोर येताच माळशिरससह संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील यशवंत सेना कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली यशवंत सेनेची जिल्ह्यातील संघटनात्मक ताकद अधिक वाढेल आणि सामाजिक व संघटनात्मक कार्याला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

या नियुक्तीप्रसंगी सुहास सिद, संजय मसके, शितल गुजरे, उमेश शिंदे, भैयासाहेब शिंदे, केतन सागर, अजय काळे, संग्राम टेळे, तुषार भिताडे, विनायक रेडे, यश देशमुख, प्रशांत शिद, चैतन्य देशमुख, ओंकार वाघमोडे, किशोर विरकर, रोहित वाघमोडे आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रकाश हनुमंत वाघमोडे यांना सोलापूर जिल्हाध्यक्षपदाच्या पुढील संघटनात्मक व सामाजिक वाटचालीस Talk18 मराठीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button