Uncategorizedअकलूजआरोग्यआर्थिकक्रीडादेश-विदेशमहाराष्ट्रविशेषशैक्षणिकसंपादकीयसामाजिक

पुरंदावडेत संत सावता माळी महाराजांच्या समाधी सोहळ्यानिमित्त भक्तिरसाचा महासागर; ११ ऑगस्टला भव्य दिव्य कीर्तन सोहळा

Talk18 मराठी l ६ ऑगस्ट l गुरुवार :

माळशिरस : वारकरी संप्रदायाचे महान संत श्री संत सावता माळी महाराज यांच्या समाधी सोहळ्यानिमित्त माळशिरस तालुक्यातील पुरंदावडे-मेढद रोड येथील नवीन श्री संत सावता माळी मंदिरात मंगळवार, दि. ११ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत भव्य दिव्य कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या भक्तिमय सोहळ्यात ह.भ.प. भरत महाराज शिंदे (चांडाळ चौकडीफेम बाळासाहेब ) आपल्या ओजस्वी वाणीने संत सावता महाराजांचे जीवनचरित्र, भक्ती, नामस्मरण आणि समाजप्रबोधनाचा संदेश भाविकांपर्यंत पोहोचवणार आहेत.

या सोहळ्याला वारकरी, भाविक आणि परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असून, हरिनामाच्या गजरात आणि विठ्ठलभक्तीच्या वातावरणात संपूर्ण परिसर भक्तिमय होणार आहे.

“संत सावता महाराजांच्या विचारातून समाजात समता, सेवा आणि भक्तीचा संदेश रुजविणारा हा सोहळा ठरणार असून, सर्व भाविकांनी उपस्थित राहून या आध्यात्मिक पर्वाचा लाभ घ्यावा,” असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

📍 स्थळ : नवीन श्री संत सावता माळी मंदिर, पुरंदावडे-मेढद रोड, ता. माळशिरस, जि. सोलापूर🗓️ दिनांक : ११ ऑगस्ट २०२६ (मंगळवार)🕙 वेळ : सकाळी १०.०० ते १२.००

— Team Talk18 मराठी

“लोकल ते ग्लोबल… जनतेच्या विश्वासाचे व्यासपीठ!”

👇

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button