
Talk18 मराठी l १६ जुलै गुरुवार l प्रतिनिधी :
पिलीव–निमगाव मार्गावरील रस्त्याच्या दुतर्फा वाढलेल्या झाडांमुळे वाहनचालकांना अडथळा निर्माण होत होता. या समस्येची दखल घेत आमदार उत्तमराव जानकर यांच्या प्रयत्नातून संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष उभे राहून रस्त्यालगतची झाडे हटविण्याचे काम करण्यात आले.

या उपक्रमामुळे रस्ता अधिक मोकळा झाला असून वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे. स्थानिक नागरिकांनीही या कामाचे स्वागत केले असून भविष्यात रस्ते सुरक्षित ठेवण्यासाठी अशा प्रकारची कामे सातत्याने व्हावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
कामासाठी गावातील श्याम तात्या मदने, लहू पाटील, शामराव गलांडे, गणेश झिंजे, नंदू काळे, केशव गलांडे, संजय कदम, राम गलांडे, जावेद जमादार, सागर कपने आणि अज्ञान पाटील यांनी प्रत्यक्ष परिश्रम घेत महत्त्वाचे योगदान दिले.

स्थानिक नागरिकांच्या सहकार्यामुळे आणि आमदार उत्तमराव जानकर यांच्या पाठपुराव्यामुळे हे काम पूर्ण झाल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
Talk18 मराठी – जनतेच्या प्रश्नांना आवाज, विकासाचा प्रत्येक टप्पा तुमच्यापर्यंत.


