अकलूजआर्थिकक्रीडामहाराष्ट्रविशेषशैक्षणिकसामाजिक

अकलूजमध्ये ‘भव्य नोकरी मेळावा २०२६’ — ७०० पेक्षा जास्त नोकरीची संधी उपलब्ध

Talk18 मराठी l अकलूज :

तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी अकलूज येथे ‘भव्य नोकरी मेळावा २०२६’चे आयोजन करण्यात आले आहे. मा. आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील आणि मा. खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम राबविण्यात येत असून, या मेळाव्यात नामांकित कंपन्यांकडून ७०० पेक्षा अधिक नोकऱ्यांच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

हा मेळावा रविवार, २६ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजताशिवरत्न नॉलेज सिटी, शिवामृत रोड, शंकरनगर, अकलूज (ता. माळशिरस, जि. सोलापूर) येथे आयोजित करण्यात आला आहे.

या मेळाव्याचा मुख्य उद्देश म्हणजे स्थानिक तरुणांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हा आहे. “युवकांच्या हाताला काम, प्रगतीचे नवे पाऊल” या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

🔹 कोणासाठी आहे हा मेळावा?या नोकरी मेळाव्यात विविध क्षेत्रातील उमेदवारांना संधी दिली जाणार आहे:

तांत्रिक शिक्षण : ITI (सर्व ट्रेड), इंजिनिअरिंग (सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, कॉम्प्युटर इ.)संगणक व व्यवस्थापन : BCA, BCS, MCA, BBAवैद्यकीय क्षेत्र : ANM, GNM, B.Sc / M.Sc Nursingपदवीधर उमेदवार : Arts, Commerce, Science

🔹 उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचनाअद्ययावत बायोडेटा (Resume) किमान ५ ते १० प्रती सोबत आणाव्यातशैक्षणिक कागदपत्रांच्या मूळ व झेरॉक्स प्रती आवश्यकपासपोर्ट साईज फोटो व ओळखपत्र (आधार कार्ड) अनिवार्य

हा मेळावा शिवरत्न शिक्षण संस्था व श्री शिवपर्वती सार्वजनिक विकास ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे.

अकलूज व परिसरातील तरुणांसाठी हा नोकरी मेळावा मोठी संधी ठरणार असून, एकाच ठिकाणी विविध कंपन्यांच्या मुलाखती देण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त युवक-युवतींनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

नोंदणी व संपर्कासाठी :

📞 डॉ. मिसाळ सर – 9822173455📞 प्रा. भारत साठे सर – 9011311406

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button