Uncategorizedअकलूजआर्थिकक्रीडामहाराष्ट्रविशेषशैक्षणिकसंपादकीय

बिरोबा यात्रेनिमित्त चांदापुरी येथे जंगी कुस्त्यांसह विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

Talk18मराठी l आण्णा भोसले :

श्री बिरोबा यात्रेनिमित्त चांदापुरी येथे जंगी कुस्त्यांचे भव्य मैदानासह विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, ग्रामस्थ आणि परिसरातील भाविकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.

गुरुवार दिनांक ९ एप्रिल २०२६ रोजी दुपारी ३ वाजता जंगी कुस्त्यांच्या मैदानाचे आयोजन करण्यात आले असून, या स्पर्धेसाठी १,५१,००० रुपयांची पहिली व दुसरी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. राज्यातील नामांकित मल्लांच्या झुंजी हे या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरणार आहे.

यात्रेनिमित्त पुढीलप्रमाणे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे👇
🔸 बुधवार दिनांक ८ एप्रिल २०२६ – किशोर कुमार म्युझिकल नाईट ऑर्केस्ट्रा
🔸 गुरुवार दिनांक ९ एप्रिल २०२६ – जंगी कुस्त्यांचे भव्य मैदान
🔸 शुक्रवार दिनांक १० एप्रिल २०२६ – बिरोबास नैवेद्य / जंगी ढोल कार्यक्रम
🔸 शनिवार दिनांक ११ एप्रिल २०२६ – बिरोबा पालखी सोहळा

तसेच कुस्ती स्पर्धांमध्ये १ लाख, ७५ हजार, ५० हजार, ३१ हजार ते ५ हजार रुपयांपर्यंत विविध बक्षिसे ठेवण्यात आली असून, विविध वजनगटातील मल्ल आपले कौशल्य दाखवणार आहेत.

या सर्व कार्यक्रमांचे आयोजन बिरोबा यात्रा कमिटी व समस्त ग्रामस्थ चांदापुरी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

📍 स्थळ: मु.पो. चांदापुरी, ता. माळशिरस, जि. सोलापूर

तरी परिसरातील नागरिकांनी या सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button