चांदापुरीचे भूमीपुत्र रमेश सरक सरांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव

📍 अकलूज | प्रतिनिधी – Talk18 मराठी
स्मृतीभवन, अकलूज येथे पंचायत समिती माळशिरस यांच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात पार पडला.
या सोहळ्यात चांदापुरीचे भूमिपुत्र रमेश सरक सर यांना शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा सन्मान माळशिरस विधानसभेचे आमदार उत्तमराव जानकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
“एव्हरग्रीन मुख्याध्यापक” म्हणून ओळखले जाणारे रमेश सरक सर यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगती सोबतच त्यांच्या व्यक्तिमत्व विकासावर ही त्यांनी विशेष भर दिला आहे. त्यांची कर्तव्यनिष्ठा प्रामाणिकपणा आणि शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याची दाखल घेत. प्रशासनाने त्यांची या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी निवड केली.
यावेळी पंचायत समितीचे सभापती दत्ताभैया मगर, उपसभापती मनीषा पाटील, डॉ. स्नेहल जीवन जानकर, व तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि शिक्षणाधिकारी सुषमा महामुनी यांची उपस्थिती होती.
🎤 यावेळी आमदार उत्तमराव जानकर म्हणाले, “शिक्षक हे समाजाचे खरे शिल्पकार आहेत. त्यांच्या ज्ञानदानामुळेच देशाची भावी पिढी घडते,” असे सांगत त्यांनी शिक्षकांच्या कार्याचे कौतुक केले.
कार्यक्रमात शिक्षकांच्या कार्याचा गौरव करण्यात आला असून, समाजाच्या घडणीत शिक्षकांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.
कार्यक्रमास मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका तसेच शिक्षण क्षेत्राशी संबंधित मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या रमेश सरक सर यांचे मनःपूर्वक अभिनंदन!


