Uncategorizedअकलूजआर्थिकक्रीडादेश-विदेशमहाराष्ट्रविशेषशैक्षणिक

माळशिरस तालुक्यात आग व वादळी पावसामुळे मोठे नुकसान; सभापती दत्ता भैय्या मगर यांची घटनास्थळी भेट

📍माळशिरस तालुका | ०७ एप्रिल २०२६

माळशिरस तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या दुर्घटनांमुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. झिंजेवस्ती येथे शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागून एक घर पूर्णपणे जळून खाक झाले, तर बचेरी येथे वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे घरांचे मोठे नुकसान झाले आहे.

झिंजेवस्ती येथे श्री. जगन्नाथ नरळे यांच्या घराला शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागली. या आगीत त्यांचे संपूर्ण घर जळून खाक झाले असून मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. या घटनेमुळे नरळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

दरम्यान, बचेरी येथे वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हाहाकार माजवला. नारायण गोरड यांच्या घरावरील पत्रे वाऱ्याने उडून गेली, तर बिरुदेव वाघमोडे यांच्या घराची भिंत पावसामुळे कोसळली. या नैसर्गिक आपत्तीमुळे दोन्ही कुटुंबांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

घटनांची माहिती मिळताच माळशिरस तालुक्याचे सभापती दत्तात्रय भैय्या मगर यांनी दोन्ही ठिकाणी तात्काळ भेट देऊन बाधित कुटुंबीयांची विचारपूस केली. त्यांनी त्यांना धीर देत शक्य ती सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले. यावेळी सोलापूर जिल्हा प्रमुख आरती बसवंती देखील उपस्थित होत्या.

या दुहेरी दुर्घटनांमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून प्रशासनाने तातडीने मदत देण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button