नातेपुते पोलिसांची धडाकेबाज कारवाई; खुनातील मुख्य आरोपी 24 तासांत जेरबंद

Talk18 मराठी प्रतिनिधी :
माळशिरस तालुक्यातील नातेपुते येथे घडलेल्या खुनाच्या गुन्ह्यात नातेपुते पोलिसांनी अवघ्या 24 तासांत मुख्य आरोपीला जेरबंद करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, 14 मार्च 2026 रोजी रात्री सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास नातेपुते येथे विजय डोंग्या भोसले (वय 35) यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. कौटुंबिक वादातून हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात विजय भोसले यांना गंभीर मारहाण करण्यात आली होती.
या प्रकरणी नातेपुते पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 96/2026 दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम 103, 115(2), 352, 351(2), 3(5) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.या गुन्ह्यातील महिला आरोपी कांती विजय भोसले हिला पोलिसांनी ताब्यात घेतले होते, तर मुख्य आरोपी रया उर्फ बि-या भोसले (रा. बारामती, ता. बारामती, जि. पुणे) हा फरार होता. पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे तपास करून आरोपीचा माग काढला.
नातेपुते पोलिसांनी सखोल तपास करत आरोपीला रहीमतपूर (जि. सातारा) येथे शोधून काढत ताब्यात घेतले. गुन्हा घडल्यापासून अवघ्या 24 तासांच्या आत आरोपीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले.ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रितम यादव, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाल्के व पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या गुन्ह्याच्या तपासासाठी नातेपुते पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि. विशाल वायकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने काम केले. या पथकात मपोनि सोनल मोरे, सपोनि सतीश पाटणकर, सपोनि देविदास धोत्रे, सपोनि रविंद्र गायकवाड, पोहेकॉ/511 धनाजी शेळके, पोना/562 राकेश लोहार, पोना/572 सुरेश एकतपुरे, पोकॉ/532 रणजित माने, पोकॉ/2058 अरस्तम शेख, मपोनि/2065 सीमा सोनवणे, वपोनि/19 संतोष वारे, वपोनि/1346 नवगाथ वडगळ तसेच सायबर शाखेचे पोलीस अंमलदार प्रविण मेटकरी यांनी विशेष परिश्रम घेतले.


