Uncategorizedअकलूजदेश-विदेशमहाराष्ट्रविशेष

शिवशंकर बझारचा राष्ट्रीय स्तरावर दुहेरी सन्मान,HUL आणि कारगिलकडून गौरव; अकलूजचा अभिमान उंचावला

📍 अकलूज | प्रतिनिधी – Talk18 मराठी

येथील शिवशंकर मध्यवर्ती सहकारी ग्राहक संस्था संचलित शिवशंकर बझारने सन २०२५ मध्ये उत्कृष्ट कामगिरीची नोंद करत राष्ट्रीय स्तरावर दुहेरी सन्मान मिळविला आहे. हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड (HUL) व कारगिल फूड सोल्युशन्स साऊथ एशिया या नामांकित कंपन्यांकडून संस्थेचा गौरव करण्यात आला.
हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेडकडून उत्कृष्ट भागीदारी व उल्लेखनीय सहकार्याबद्दल संस्थेला “कौतुक पुरस्कार” प्रदान करण्यात आला. पश्चिम विभागाच्या महाव्यवस्थापक नीरजा चौधरी यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.
तसेच, कारगिल फूड सोल्युशन्स साऊथ एशियाकडूनही शिवशंकर बझारचा गौरव करण्यात आला. वरिष्ठ संचालक (B2C फूड सर्व्हिसेस अॅन्ड बेकरी) शैलेश खुराणा व संचालक (NSM B2C) कुंदन कुमार मिश्रा यांच्या हस्ते संस्थेला “सुपरस्टार्स” स्टार रिटेल आऊटलेट प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. भारतातील टॉप १००० स्टार रिटेल आऊटलेट्समध्ये स्थान मिळवत कारगिलच्या वाढीत मोलाचे योगदान दिल्याबद्दल हा सन्मान देण्यात आला. संस्थेच्या चेअरमन डॉ. स्वयंप्रभादेवी मोहिते पाटील यांनी हा सन्मान स्विकारला.
संस्थापक स्व. उदयसिंह मोहिते पाटील यांनी घालून दिलेल्या ध्येयधोरणानुसार तसेच शिवरत्न उद्योग समूहाचे चेअरमन कीर्तिध्वजसिंह मोहिते पाटील व अकलूज नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेची यशस्वी वाटचाल सुरू आहे.
या यशाबद्दल चेअरमन डॉ. स्वयंप्रभादेवी मोहिते पाटील यांनी व्यवस्थापक गोपाळराव देशमुख, व्हाइस चेअरमन मदन भगत, संचालक किसनराव धुमाळ, अर्जुन भगत, सिनाप्पा वाघमोडे, कैलास ताटे, अनिल उघडे, नारायण फुले, तसेच चीफ अकाउंटंट उत्तम गुरूगुळे, चीफ परचेस ऑफिसर सुरेंद्र माने व सर्व कर्मचारी यांचे अभिनंदन केले.
या दुहेरी सन्मानामुळे अकलूजच्या शिवशंकर बझारचे नाव राष्ट्रीय स्तरावर उजळले असून, स्थानिक सहकार क्षेत्रासाठीही ही अभिमानाची बाब मानली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button