वेळापूर येथे विविध आजारांवर मोफत आरोग्य तपासणी शिबिर

Talk18 मराठी प्रतिनिधी:
वेळापूर (ता. माळशिरस) : आ. मा. श्री. उत्तमराव जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली व सेवारसदन मल्टिस्पेशालिटी मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने वेळापूर नगरीत मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर शनिवार दि. ०७ मार्च २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजता पार पडणार आहे.
या शिबिरामध्ये नागरिकांच्या विविध आजारांवर तपासणी व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्यामध्ये डोळे तपासणी, नाक-घसा तपासणी, दंत तपासणी, दमा, अॅलर्जी, त्वचारोग, हृदयविकार, डायबिटीज, थायरॉईड, संधिवात, पोटाचे विकार यांसह विविध आजारांवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी व सल्ला दिला जाणार आहे.
तसेच या शिबिरामध्ये रक्त तपासणी, मूत्र तपासणी, सोनोग्राफी, ईसीजी, शुगर तपासणी, कोलेस्टेरॉल तपासणी, क्रिएटिनिन तपासणी, रक्तातील पांढऱ्या कणांची तपासणी अशा विविध तपासण्या करण्यात येणार असून मोफत कॅन्सर तपासणी देखील केली जाणार आहे.
या आरोग्य शिबिरास मा. खा. श्री. धैर्यशील राजसिंह मोहिते-पाटील (खासदार, माढा लोकसभा), मा. आ. श्री. उत्तमराव शिवदास जानकर (आमदार, माळशिरस विधानसभा) तसेच मा. डॉ. श्री. धवलसिंह प्रतापसिंह मोहिते-पाटील (कार्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद) यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या शिबिरामध्ये मा. डॉ. श्री. एम. के. इनामदार (अश्विनी हॉस्पिटल, अकलूज), मा. डॉ. श्री. किशोर गिरमे (गिरमे हॉस्पिटल, अकलूज), मा. डॉ. श्री. विजयजीत कदम (गिरमे हॉस्पिटल, अकलूज) तसेच मा. डॉ. श्री. नेहल जानकर आदी तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित राहून नागरिकांची तपासणी करणार आहेत.
या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून नूतन जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य . मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
हे शिबिर गरुड बंगला समोर, जानकर कॉम्प्लेक्स, वेळापूर ता. माळशिरस येथे आयोजित करण्यात आले असून या शिबिराचा नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक अमोल (भैय्या) पनारे मित्र परिवार, वेळापूर यांच्या वतीने करण्यात आले आहे.



