देश-विदेशमहाराष्ट्र

रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांची राज्यसभेवर उमेदवारी जाहीर; राजाभाऊ सरवदे यांनी केले अभिनंदन

माळशिरस प्रतिनिधी :रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री Ramdas Athawale यांची राज्यसभेवर उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे महाराष्ट्र राज्याध्यक्ष Rajabhau Sarvade यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

यावेळी पक्षाचे सरचिटणीस Gautam Sonawane यांनीही रामदास आठवले साहेबांना शुभेच्छा देत त्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष अधिक मजबूत होत असून सामाजिक न्यायाच्या प्रश्नांवर ते राज्यसभेत प्रभावीपणे आवाज उठवतील, असा विश्वास व्यक्त केला.

रामदास आठवले यांची राज्यसभेवर उमेदवारी जाहीर झाल्यामुळे रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून देशातील वंचित, पीडित व मागास घटकांच्या प्रश्नांना संसदेत अधिक ताकद मिळेल, अशी भावना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.l

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button