Uncategorizedअकलूजआरोग्यआर्थिकक्रीडादेश-विदेशमहाराष्ट्रविशेषशैक्षणिकसंपादकीयसामाजिक

सोलापूर विधानपरिषद निवडणुकीत जीवन जानकर यांची दमदार एन्ट्री; उमेदवारी अर्ज दाखल

३१ मे २०३६

Talk18 मराठी l सोलापूर प्रतिनिधी :

सोलापूर जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद मतदारसंघाच्या निवडणुकीत राजकीय घडामोडींना वेग आला असून आमदार उत्तमराव जानकर यांचे चिरंजीव जीवन जानकर यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या उमेदवारीमुळे निवडणुकीत रंगत वाढली असून जिल्ह्याच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.

उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर जीवन जानकर यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “सोलापूर जिल्ह्याच्या स्वाभिमानी जनतेचा विश्वास, विकासाचा निर्धार आणि जनहिताचा संकल्प सोबत घेऊन मी या निवडणुकीच्या रणांगणात उतरलो आहे. ही केवळ निवडणूक नसून स्वाभिमान, विश्वास आणि जनतेच्या हक्कांची लढाई आहे. ही लढाई आरपार होणार असून जनतेच्या पाठबळावर विजय मिळवू,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

जीवन जानकर यांच्या उमेदवारीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींमध्ये उत्सुकता निर्माण झाली असून आगामी काळात या निवडणुकीत चुरशीची लढत पाहायला मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे आमदार उत्तमराव जानकर यांच्या राजकीय वारशाची जबाबदारी स्वीकारत जीवन जानकर यांनी निवडणुकीच्या मैदानात उडी घेतल्याने त्यांच्या उमेदवारीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
सोलापूर विधानपरिषद निवडणुकीत आता विविध राजकीय पक्ष आणि अपक्ष उमेदवारांच्या हालचालींना वेग आला असून पुढील काही दिवसांत राजकीय समीकरणे अधिक स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button