Uncategorized

सामाजिक कार्याची दखल; वजीर शेख यांना ‘महाराष्ट्र रत्न’ पुरस्काराने सन्मानित

अकलूज | प्रतिनिधी – Talk18 मराठी

अकलूज येथील मुस्लिम समाजाचे नेते तथा माजी सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्य सेलचे जिल्हाध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यक विभागाचे राज्य सरचिटणीस मा. वजीर रहिमहुल्लाह शेख यांना आहिल्यानगर येथे आयोजित राज्यस्तरीय सोहळ्यात ‘महात्मा फुले महाराष्ट्र रत्न’ हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला

हॉटेल गोल्ड रोज येथे झालेल्या या पुरस्कार वितरण समारंभात सायलीताई धनाबाई तसेच प्रसिद्ध आदर्श समाजसेवक ज्योतिषाचार्य दिपक दीक्षित यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.

कोरोना महामारीच्या कठीण काळात रुग्णांना व गरजू नागरिकांना दिलेली अतुलनीय सेवा, मौलाना आझाद महामंडळाच्या माध्यमातून सुमारे ६००० लाभार्थ्यांना कर्जवाटप करून दिलेले सहकार्य तसेच अकलूज परिसरात सामाजिक व राजकीय पातळीवर केलेल्या कार्याची दखल घेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

यावेळी लोकनेते प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष जुल्कर भैय्या शेख यांनी मा. वजीर शेख यांचे अभिनंदन करताना सांगितले की, “मा. वजीर शेख यांनी समाजकार्याच्या माध्यमातून सर्वसामान्यांमध्ये विश्वास निर्माण केला आहे. कोरोना काळातील त्यांची सेवा, अल्पसंख्याक समाजासाठी केलेले प्रयत्न आणि स्थानिक पातळीवरील विकासकामे ही निश्चितच प्रेरणादायी आहेत. हा पुरस्कार त्यांच्या सातत्यपूर्ण कार्याची पावती आहे.” त्यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत त्यांच्या कार्यास सदैव साथ देण्याचा विश्वासही व्यक्त केला.

सन्मानानंतर अकलूज परिसरासह विविध सामाजिक व राजकीय स्तरांतून मा. वजीर शेख यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button