माढा मतदारसंघातील रखडलेल्या कामांवर मुंबईत चर्चा; खासदार मोहिते पाटील यांची उपमुख्यमंत्री शिंदेंकडे मागणी

Talk18मराठी l आण्णा भोसले :
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री Eknath Shinde यांची खासदार Dhairyasheel Mohite Patil यांनी ठाणे येथे सदिच्छा भेट घेत माढा लोकसभा मतदारसंघातील प्रलंबित विकास कामांबाबत सविस्तर चर्चा केली.
या बैठकीत माढा मतदारसंघातील Maharashtra State Road Development Corporation (MSRDC) अंतर्गत रखडलेल्या रस्ते व पुलांच्या कामांमुळे निर्माण झालेली वाहतूक कोंडी, वाढता अपघात धोका आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणींचा मुद्दा खासदार मोहिते पाटील यांनी ठळकपणे मांडला. प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी संबंधित विभागांना स्पष्ट निर्देश द्यावेत, अशी त्यांनी विनंती केली.
तसेच अकलूज, करमाळा, माढा आणि नातेपुते येथील नगरपरिषद व नगरपंचायतीअंतर्गत पाणीपुरवठा योजना, रस्ते दुरुस्ती, ड्रेनेज व्यवस्था, अंतर्गत गटार योजना, सार्वजनिक सुविधा आणि नागरी विकासाशी संबंधित विविध प्रस्तावांचे निवेदनही मंत्री महोदयांना सादर करण्यात आले. या कामांना लवकर मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व प्रस्तावांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून संबंधित विभागांना त्वरित कार्यवाहीचे निर्देश देण्याचे आश्वासन दिले.
या भेटीमुळे माढा लोकसभा मतदारसंघातील प्रलंबित विकासकामांना गती मिळेल आणि नागरिकांना लवकरच दिलासा मिळेल, असा विश्वास खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी व्यक्त केला.
— Talk18 मराठी


