सोलापूर येथे राजाभाऊ सरवदे यांच्या शुभहस्ते सौ. मिनाक्षी सरतापे यांचा भव्य सत्कार

Talk18 मराठी l सोलापूर : वेळापूर जिल्हा परिषद गटातून प्रचंड बहुमताने विजयी झालेल्या नूतन सदस्या सौ. मीनाक्षी मिलिंद सरतापे यांचा सोलापूर येथील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्ष कार्यालयात भव्य सत्कार सोहळा उत्साहात पार पडला.
🔹 राजाभाऊ सरवदे काय म्हणाले?
महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. राजाभाऊ सरवदे साहेब यांनी आपल्या मनोगतात प्रभावी शब्दांत भावना व्यक्त करताना सांगितले —“चळवळीच्या विचारांशी एकनिष्ठ राहून काम करणारा सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणजे मिलिंद (नाना) सरतापे. त्यांच्या सातत्यपूर्ण परिश्रमामुळेच आज हा विजय घडून आला आहे.”“सौ. मीनाक्षी सरतापे यांना उमेदवारी देताना जनतेशी नाळ जुळलेले नेतृत्व पुढे आणण्याचा आमचा निर्धार होता. त्यांना विजयी करण्यासाठी मोहिते पाटील परिवार आणि आमदार उत्तमराव जानकर यांनी दिलेले सहकार्य मोलाचे आहे.
”यावेळी त्यांनी खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि आमदार उत्तमराव जानकर यांचे विशेष आभार मानले. तब्बल पंचवीस वर्षानंतर रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्याला हा सन्मान मिळाला,“हा विजय एका व्यक्तीचा नसून कार्यकर्त्यांच्या एकजुटीचा आणि जनतेच्या विश्वासाचा आहे,” असे त्यांनी ठामपणे नमूद केले.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले व राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील या दोन्ही नेत्यांची मार्गदर्शनाखाली काम करत असताना अनेक राजकीय व सामाजिक प्रश्नांवर नेते व कार्यकर्ते यांच्यात वैचारिक एकोपा पहायला मिळाला आहे ना. रामदास आठवले साहेब आणि विजयसिंह मोहिते पाटील साहेब यांचे राजकारणापलीकडे असणारे ऋणाबंध यावेळी आवर्जून दृष्टिक्षेपात येतात यामुळेच वेळापूर जिल्हा परिषद गटातून रिपब्लिकन पक्षाचे अत्यंत विश्वासू म्हणून मिलिंद नाना सरतापे या सर्व समावेशक कार्यकर्त्याच्या पत्नीला जिल्हा परिषदेवर काम करण्याची संधी मिळाली आहे.
🔹 कार्यक्रमास उपस्थित मान्यवरया भव्य सत्कार सोहळ्यास खालील मान्यवर उपस्थित होते :प्रदेशाध्यक्ष मा. राजाभाऊ सरवदे साहेब राज्य उपाध्यक्ष के डी कांबळे, पश्चिम महाराष्ट्र सचिव दयानंद (भाऊ) धाईंजे नूतन जिल्हा परिषद सदस्या सौ. मीनाक्षी मिलिंद सरतापे आरपीआय (आठवले) माळशिरस तालुका अध्यक्ष मिलिंद (नाना) सरतापे सरचिटणीस श्यामसुंदर गायकवाड ज्येष्ठ नेते दत्तात्रय कांबळे पाटील जिल्हा उपाध्यक्ष सुग्रीव जेठीथोर जिल्हा उपाध्यक्ष शामराव भोसले संघटन सचिव ॲड. सिद्धार्थ बनसोडे,वेळापूर विद्यमान सरपंच रजनीश बनसोडे तालुका उपाध्यक्ष संतोष कांबळे तालुका संघटन सचिव पोपट गेजगे युवक तालुका सरचिटणीस प्रवीण साळवे युवक जिल्हा उपाध्यक्ष संतोष चंदनशिवे तालुका उपाध्यक्ष बाबुराव भोसले युवक कार्यकर्ते रविराज बनसोडे प्रेमसिंह कांबळे पाटील विझोरी अध्यक्ष गौतम वाघबरे,वीझोरी माजी सरपंच राहुल वाघबरे तालुका अध्यक्ष मिलिंद (नाना) सरतापे लोकनेते प्रतिष्ठानचे अध्यक्ष जुल्कर शेख पत्रकार आण्णा भोसले ॲड. गोपाळ लावंड स्वप्निल भैय्या माने देशमुख जवान राजे माने देशमुख ग्रामपंचायत सदस्य हनुमंत वायदंडे पत्रकार तुषार केंगार श्रीपुर शहराध्यक्ष गणेश सावंत प्रदीप सरवदे धनाजी धांडोरेवे ळापूर शहराध्यक्ष शरद साबळे संतोष बनसोडे वेळापूर युवक अध्यक्ष स्वप्निल सरवदे गणेश साठे दीपक भोसले आदी मान्यवर व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा सोहळा उत्साहात पार पडला.
सौ. मीनाक्षी सरतापे यांच्या विजयानंतर वेळापूर गटात नवचैतन्य निर्माण झाले असून, त्यांच्या नेतृत्वाखाली सर्वांगीण आणि लोकाभिमुख विकास साधला जाईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
💐 मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!
— Team Talk18 मराठी


