Uncategorized

निमगाव गणात तरुण शक्तीचा उदय; पै. दत्ता भैय्या मगर ३३३० मतांनी विजयी

Talk18 मराठी आण्णा भोसले :

निमगाव पंचायत समिती गणात तरुण नेतृत्वाची जोरदार एन्ट्री झाली आहे. पैलवान दत्ता भैय्या रावसाहेब मगर यांनी तब्बल ३३३० मताधिक्याचा लीड घेत दणदणीत विजय मिळवत राजकीय मैदान गाजवलं आहे. सलग दोन निवडणुकांतील पराभवानंतर मगर कुटुंबासाठी हा विजय ऐतिहासिक मानला जातो.

पै.दत्ता भैय्या मगर यांनी कै. नानासाहेब मगर यांच्या समाजकारणाचा वारसा जपत, वडील मल्ल सम्राट राव आप्पा मगर यांच्या मार्गदर्शनाखाली निमगाव व माळशिरस तालुक्यात केलेल्या कामांची पावती मतदारांनी दिली आहे. शेती, कुस्ती आणि सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेलं त्यांचं काम मतदारांनी लक्षात ठेवलं.

🍀 ‘३’ नंबर ठरला लकी!

या विजयामागे एक रंजक योगायोगही चर्चेत आहे. दत्ता भैय्या मगर यांच्या फॉर्च्युनर गाडीचा नंबर ‘३’ आहे आणि यंदाच्या निवडणुकीतही त्यांना ३३३० मतांचं लीड मिळालं. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये “३ नंबर दत्ता भैय्यांसाठी लकी” अशी चर्चा रंगली आहे.

गेल्या तीन पिढ्यांपासून मोहिते पाटील परिवार यांच्याशी असलेले संबंध आणि उत्तमराव जानकर यांच्याशी असलेली जवळीक या विजयात महत्त्वाची ठरल्याचं बोललं जात आहे.

या निवडणुकीत त्यांनी शिवसेना (एकनाथ शिंदे) यांच्या धनुष्यबाण चिन्हावर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मित्र आघाडीसह निवडणूक लढवली होती.

निमगाव पंचायत समिती गणात आता विकासकामांना गती मिळेल, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button