Uncategorizedअकलूजआरोग्यआर्थिकक्रीडादेश-विदेशमहाराष्ट्रविशेषशैक्षणिकसंपादकीय

सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीत धैर्यशील कदम-पाटील यांचा दणदणीत विजय

सांगली | रविवार, दि. २२ जून २०२६ | प्रतिनिधी:

सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार धैर्यशील (दादा) कदम-पाटील यांनी दणदणीत विजय मिळवत आमदारपद पटकावले आहे. या निवडणुकीत एकूण ८९४ मते पडली असून त्यापैकी ५९१ मते धैर्यशील कदम-पाटील यांना मिळाली.

त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसचे अभयसिंह जगताप यांना २९५ मते मिळाली. त्यामुळे धैर्यशील कदम-पाटील यांनी २९६ मतांच्या मोठ्या फरकाने विजय संपादन केला. या निकालानंतर भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

दरम्यान, भाजपाचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण (पिनुशेठ) कदम-पाटील यांनी नवनिर्वाचित आमदार धैर्यशील (दादा) कदम-पाटील यांचे अभिनंदन केले. हा विजय कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमाचा, पक्षावरील निष्ठेचा आणि मतदारांनी दाखविलेल्या विश्वासाचा असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच धैर्यशील दादा कदम-पाटील यांच्या नेतृत्वाखाली सांगली-सातारा परिसराच्या विकासाला अधिक गती मिळेल, असा विश्वास व्यक्त करत पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

या विजयामुळे सांगली-सातारा जिल्ह्याच्या राजकारणात भाजपची ताकद अधिक बळकट झाल्याचे मानले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button