Uncategorizedअकलूजआरोग्यआर्थिकक्रीडादेश-विदेशमहाराष्ट्रविशेषशैक्षणिकसंपादकीयसामाजिक

डॉ. राजेंद्र रुपनवर आत्महत्या प्रकरणाची SIT चौकशी करा, आमदार उत्तमराव जानकर यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांकडे मागणी

Talk18 मराठी l १ सप्टेंबर मंगळवार:

मुंबई प्रतिनिधी :

आरोग्य विभागातील डॉ. राजेंद्र जगन्नाथ रुपनवर यांच्या आत्महत्या प्रकरणाची स्वतंत्र विशेष तपास पथकाद्वारे (SIT) चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी माळशिरसचे आमदार उत्तमराव शिवदास जानकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

आमदार जानकर यांनी १ सप्टेंबर २०२६ रोजी पत्राद्वारे ही मागणी केली. दि. २९ ऑगस्ट २०२६ व दि. २७ ऑगस्ट २०२६ रोजी घडलेल्या घटनांची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्यासाठी वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र SIT तातडीने गठित करावी, अशी मागणी पत्रात करण्यात आली आहे.

मानसिक छळ व आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०८ अंतर्गत गुन्हा दाखल झालेल्या संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी, तसेच संबंधित महिला कर्मचाऱ्यांची सखोल चौकशी करावी, अशीही मागणी जानकर यांनी केली आहे.

या प्रकरणाचा फास्ट-ट्रॅक न्यायालयात खटला चालवून पीडित कुटुंबाला लवकर न्याय द्यावा, तसेच संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या चौकशीचा अहवाल तातडीने जाहीर करावा, अशी मागणीही त्यांनी केली. डॉ. रुपनवर यांची मूळ सुसाईड नोट, मोबाईलमधील फुटेज व इतर डिजिटल पुरावे कुटुंबीयांच्या माहितीसाठी स्पष्ट करावेत, अशी विनंती पत्रातून करण्यात आली आहे.

दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करून पीडित कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा, अशी ठाम भूमिका आमदार उत्तमराव जानकर यांनी घेतली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button