Uncategorizedअकलूजआरोग्यआर्थिकक्रीडादेश-विदेशमहाराष्ट्रविशेषशैक्षणिकसंपादकीयसामाजिक

आमदार उत्तमराव जानकर यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

Talk18 मराठी l 14 जुलै 2026 l प्रतिनिधी :

वेळापूर येथे आमदार उत्तमराव जानकर यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त आज (१७ जुलै) भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. समाजाप्रती बांधिलकी जपत रक्तदानासारख्या जीवनदायी उपक्रमातून वाढदिवस साजरा करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात येत आहे.

हे रक्तदान शिबिर सकाळी ९.३० ते सायंकाळी ५.०० या वेळेत गरुड बंगल्यासमोर, वेळापूर येथे पार पडणार असून, परिसरातील युवक, महिला आणि सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन स्वेच्छेने रक्तदान करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

रक्ताचा तुटवडा लक्षात घेता गरजू रुग्णांना वेळेत रक्त उपलब्ध व्हावे, या सामाजिक उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. अपघातग्रस्त, शस्त्रक्रिया होणारे रुग्ण, थॅलेसेमिया व इतर गंभीर आजारांनी ग्रस्त रुग्णांसाठी रक्तदान हे जीवनदायी ठरत असल्याने प्रत्येकाने सामाजिक जबाबदारी म्हणून रक्तदान करावे, असा संदेशही यावेळी देण्यात येत आहे.

या उपक्रमाचे आयोजन युवा नेते अमोल पनासे मित्रपरिवार यांच्या वतीने करण्यात आले असून, विविध सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिकांची उपस्थिती अपेक्षित आहे. “रक्तदान हेच श्रेष्ठदान” हा संदेश देत अधिकाधिक रक्तदात्यांनी या उपक्रमात सहभागी होऊन समाजकार्यात हातभार लावावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Talk18 मराठी सर्व नागरिकांना या सामाजिक उपक्रमात सहभागी होऊन रक्तदानाद्वारे गरजूंचे प्राण वाचविण्याच्या कार्यात योगदान देण्याचे आवाहन करते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button