महाराष्ट्र

आमदार उत्तमराव जानकर यांच्या शुभ हस्ते वेळापूर–पिलीव रस्त्यावरील पुलाचे भूमिपूजन संपन्न

Talk18 मराठी l प्रतिनिधी झिंजेवस्ती

माळशिरस तालुक्यातील झिंजेवस्ती येथे वेळापूर–पिलीव रस्त्यावरील पुलाच्या बहुप्रतिक्षित बांधकामाचे भूमिपूजन माळशिरस तालुक्याचे कार्यक्षम व लोकप्रिय आमदार मा. श्री. उत्तमराव जानकर साहेब यांच्या शुभहस्ते पार पडले. सदर पुलाचे काम आमदार जानकर साहेबांच्या स्थानिक विकास निधी (आमदार फंड) अंतर्गत मंजूर झाले आहे.

या पुलाच्या उभारणीमुळे झिंजेवस्ती परिसरासह आजूबाजूच्या गावांतील दळणवळण अधिक सुरक्षित, सुकर व कायमस्वरूपी होणार असून शेतकरी, विद्यार्थी, नोकरदार व सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. विशेषतः पावसाळ्यात होणाऱ्या वाहतूक अडचणी, पाण्याचा अडथळा व जीवितहानीचा धोका कमी होणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

भूमिपूजनप्रसंगी आमदार उत्तमराव जानकर साहेब यांनी सांगितले की, “ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा मजबूत केल्याशिवाय सर्वांगीण विकास शक्य नाही. हा पूल म्हणजे केवळ वाहतुकीचा मार्ग नसून परिसराच्या प्रगतीचा नवा दुवा ठरेल.” या विकासकामामुळे झिंजेवस्ती परिसराच्या आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक विकासाला गती मिळणार आहे.

या कार्यक्रमास बचेरी ग्रामस्थांसह शामतात्या मदने, किशोर कदम, शामराव गलांडे, लहू पाटील, दादा पिसे, राजू माळी, मधुकर मदने, एकनाथ माळी, केशव मदने, गणेश जिल्हे, अंकुश मदने, कुंडलिक कपने, रंजीत मदने, रंजीत आप्पा, उमेश मिटकरी, बाबुराव पाटील, नाथाजी मदने, संभाजी लेंगरे, श्रीमंत कदम, प्रकाश विठ्ठल मदने आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button