Uncategorizedअकलूजआरोग्यआर्थिकक्रीडादेश-विदेशमहाराष्ट्रविशेषशैक्षणिकसामाजिक

आमदार उत्तमराव जानकर यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे अकलूज–वेळापूर रस्त्यासाठी ४८ कोटींच्या निधीची मागणी

Talk18 मराठी l आण्णा भोसले l माळशिरस:

माळशिरस तालुक्यातील अत्यंत महत्त्वाच्या अकलूज–वेळापूर मार्गाच्या काँक्रीटीकरण व मजबुतीकरणासाठी केंद्रीय रस्ता निधी (CRF) योजनेअंतर्गत तब्बल ४८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करावा, अशी मागणी आमदार Uttamrao Jankar यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री Nitin Gadkari यांच्याकडे केली आहे.

इंदापूर–अकलूज–सांगोला–जत–मेंढेगिरी–उमराणी राज्य महामार्ग क्रमांक १२५ अंतर्गत येणारा अकलूज–वेळापूर रस्ता सध्या अत्यंत खराब अवस्थेत असून, माळशिरस तालुक्यातील कि.मी. २९/१०० ते ३९/४०० दरम्यान मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारक, शेतकरी, व्यापारी, प्रवासी तसेच पंढरपूरकडे जाणाऱ्या भाविकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, संबंधित रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असला तरी आवश्यक निधी उपलब्ध न झाल्याने काम रखडले आहे. तसेच इंदापूर–अकलूज–वेळापूर–जत मार्ग राष्ट्रीय महामार्गात समाविष्ट झाल्यानंतर अकलूज–वेळापूर रस्त्याकडे दुर्लक्ष झाल्याने रस्त्याची दुरवस्था अधिकच वाढली आहे. परिणामी अपघातांचा धोका देखील वाढला आहे.

हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८सी आणि ९६५ ला जोडणारा महत्त्वाचा दुवा असून, Pandharpur येथे जाणाऱ्या भाविकांसाठीही हा प्रमुख मार्ग मानला जातो. त्यामुळे या रस्त्याचे धार्मिक, सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या मोठे महत्त्व असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

आमदार Uttamrao Jankar यांच्या वतीने त्यांचे सुपुत्र तथा युवा नेते जीवन भैया जानकर यांनी केंद्रीय मंत्री Nitin Gadkari यांना निवेदन सादर केले. यावेळी आमदार Ranjitsinh Mohite-Patil, पंचायत समिती सभापती दत्ता भैया मगर, जिल्हा परिषद सदस्य तथा माजी सभापती मच्छिंद्र ठवरे, माजी पंचायत समिती सदस्य अजय सकट, भानुदास सालगुडे पाटील, सोमनाथ पिसे आदी मान्यवर उपस्थित होते.

अकलूज–वेळापूर रस्त्याच्या कामास तातडीने मंजुरी मिळून नागरिकांना सुरक्षित आणि सुकर प्रवासाची सुविधा उपलब्ध व्हावी, अशी अपेक्षा परिसरातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button