Uncategorizedअकलूजदेश-विदेशमहाराष्ट्रविशेषशैक्षणिकसंपादकीयसामाजिक

शिवरायांचा अपमान सहन केला जाणार नाही! बागेश्वर बाबांविरोधात कडक कारवाई करण्याची माळशिरस काँग्रेसची मागणी

अकलूज | दिनांक 27 एप्रिल 2026 (Talk18 मराठी)

इतिहासाची मोडतोड करून छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबांविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणी कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी माळशिरस तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आली असून यासंदर्भात तहसीलदार सुरेश विठ्ठलराव शेजूळ यांना निवेदन देण्यात आले.

हे निवेदन देताना तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गिरीश प्रभाकर शेटे , ज्येष्ठ पत्रकार भाग्यवंत द्रोपदी लक्ष्मण नायकुडे, अ‍ॅड. भगवान घाईंजे , काँग्रेसचे युवा नेते सुभाष सरतापे, रमेश नामदास, भरतराव रुपनवर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असून त्यांच्या विषयी अपमानास्पद वक्तव्य करणे अत्यंत निंदनीय आहे. अशा प्रकारचे वक्तव्य कोणताही शिवप्रेमी सहन करणार नाही. संबंधित कार्यक्रमात राज्यातील उच्चपदस्थ नेते उपस्थित असतानाही त्यांनी विरोध न करता मौन बाळगल्याची खंतही व्यक्त करण्यात आली आहे.

तसेच, या प्रकरणी धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांच्या विरोधात तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी आणि महाराष्ट्रात त्यांच्या प्रवेशावर कायमस्वरूपी बंदी घालण्यात यावी, अशी ठाम मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button