पांडुरंग तात्या वाघमोडे व सुरेश आबा वाघमोडे मित्र परिवाराकडून गुणवंतांचा गौरव
सोमवार दि. २२ जून :
माळशिरस नगरपंचायतीच्या नगरसेविका अॅड. रेशमाताई टेळे यांची वकीली क्षेत्रात निवड झाल्याबद्दल तसेच चारूशिला धाईंजे आणि निकिता वाघमोडे यांची महसूल सहाय्यक पदावर निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.
जिल्हा नियोजन समिती सदस्य पांडुरंग (तात्या) वाघमोडे तसेच नगरसेवक सुरेश आबा वाघमोडे मित्र परिवाराच्या वतीने आयोजित कार्यक्रमात निवड झालेल्या तिघींना शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या यशाचे कौतुक करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमास डॉ. मारुती पाटील, अॅड. सोमनाथ आण्णा वाघमोडे, विकास धाईंजे, अनिल सावंत, काकासाहेब पाटील, विष्णूपंत केतकर, शामराव वाघमोडे, डॉ. नानासाहेब वाघमोडे, माणिकराव (भैय्या) वाघमोडे, सागर धाईंजे, विकास लष्करे, गणेश काटे, दादासाहेब पांढरे, रशीद मुलाणी, नगरसेवक कैलास वामन, संजय वाघमोडे, बापूसाहेब पाटील, संजय जगताप, प्रदीप धाईंजे, रणजित धाईंजे, सोहेल नलवडे, सुरेश वाघमोडे, नवनाथ भिसे, सचिन वाघमोडे, महादेव वाघमोडे, राजू वाघमोडे, अक्षय वाघमोडे, आण्णा वाघमोडे, हैदर अली, रोहित वाघमोडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
निवड झालेल्या तिघींनी आपल्या यशाचे श्रेय कुटुंबीय, शिक्षक व मार्गदर्शकांना दिले. त्यांच्या या यशामुळे माळशिरस परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


