Uncategorized

निमगाव पंचायत समिती गणात पै. दत्ता भैय्या मगर यांचे पारडे जड

Talk18 मराठी l आण्णा भोसले :

माळशिरस तालुक्यातील निमगाव पंचायत समिती गण सध्या राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी असून, या गणामध्ये पै. दत्ता भैया मगर यांचे पारडे जड असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे.
या गणामध्ये निमगाव, खुडूस, निकमवाडी, डोंबाळवाडी, झंजेवाडी आणि खडूस या गावांचा प्रामुख्याने समावेश होतो.
या परिसरातील प्रमुख नेतेमंडळी, यांच्याशी असलेले मल्लसम्राट राव आप्पा मगर यांचे संबंध लक्षात घेता पै. दत्ता भैय्या मगर यांना स्थानिक पातळीवर मोठे पाठबळ मिळत आहे.

विशेष म्हणजे मोहिते पाटील परिवाराशी असलेले चार पिढ्यांचे जुने संबंध आणि आमदार उत्तमराव जानकर यांना विधानसभा निवडणुकीत दिलेली भक्कम साथ, यामुळे दत्ता भैया मगर यांची विश्वासार्हता अधिक बळकट झाली आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर निमगाव पंचायत समिती गणातील नागरिकांकडूनच दत्ता भैया मगर यांच्या उमेदवारीसाठी आग्रह असल्याचे पाहायला मिळाले. गणातील विविध गावांमधील नेतेमंडळींनी देखील एकमताने त्यांच्या उमेदवारीला पाठिंबा दर्शवला आहे.

दरम्यान, माळशिरस तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस (तुतारी), राष्ट्रवादी काँग्रेस (घड्याळ), शिवसेना (एकनाथ शिंदे – धनुष्यबाण) आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) अशी महाआघाडी तयार झाल्याने राजकीय समीकरणे बदलली आहेत.
या आघाडीमध्ये खासदार धैर्यशील भैया मोहिते पाटील, आमदार उत्तमराव जानकर यांच्यासह तालुक्यातील मतदारांचा कल पाहता, येणाऱ्या पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये या गटाचे वर्चस्व राहील, असा अंदाज राजकीय तज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.
महत्त्वाचे म्हणजे, दत्ता भैया मगर यांच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्य सातत्याने सुरू आहे. गरजू लोकांसाठी मदत, सामाजिक उपक्रम आणि स्थानिक प्रश्नांमध्ये सक्रिय सहभाग यामुळे त्यांची प्रतिमा समाजसेवक म्हणून अधिक ठळक झाली आहे.

अलीकडेच Talk18मराठी या चॅनलशी बोलताना पै. दत्ता भैय्या मगर म्हणाले,
“देवाने मला सर्व काही दिले आहे. मला या निवडणुकीतून काही कमवायचे नाही. जनतेची सेवा करायची आहे, म्हणूनच मी निवडणुकीच्या मैदानात उतरलो आहे. मायबाप मतदारांनी मला साथ व आशीर्वाद द्यावा,” असे भावनिक आवाहन त्यांनी केले.

एकूणच निमगाव पंचायत समिती गणामध्ये पै. दत्ता भैया मगर यांच्या उमेदवारीला वाढता प्रतिसाद आणि व्यापक पाठिंबा मिळत असून, ही लढत त्यांच्या बाजूने झुकत असल्याचे स्पष्ट संकेत सध्या दिसत आहेत.


— Talk18 मराठी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button