Uncategorizedअकलूजआरोग्यआर्थिकक्रीडादेश-विदेशमहाराष्ट्रविशेषशैक्षणिकसंपादकीय

आरोग्यवर्धिनी केंद्र माळशिरसच्या अध्यक्षपदी ॲड. रेश्माताई टेळे

दिनांक : १५ सप्टेंबर २०२६ | वार : मंगळवार

Talk18 मराठी प्रतिनिधी :

माळशिरस येथील नागरी आरोग्यवर्धिनी केंद्राच्या अध्यक्षपदी माळशिरस नगरपंचायतीच्या विद्यमान नगरसेविका ॲड. रेश्माताई टेळे यांची निवड करण्यात आली आहे. लोकसहभागातून आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने शासनाने स्थानिक विधानसभा सदस्यांच्या अध्यक्षतेखाली एकात्मिक आरोग्यवर्धिनी समिती स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र माळशिरस समिती तसेच रुग्णालयातील रुग्ण कल्याण समितीमध्ये लोकप्रतिनिधी म्हणून ॲड. टेळे यांची भूमिका महत्त्वपूर्ण राहणार आहे. आरोग्य, स्वच्छता, पोषण, पाणी गुणवत्ता तसेच रोगप्रतिबंधक उपाययोजनांमध्ये नागरिकांचा सहभाग वाढवून आरोग्य सेवा अधिक लोकाभिमुख करण्यासाठी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिलेल्या पत्रातून करण्यात आले आहे.

ॲड. रेश्माताई टेळे यांनी यापूर्वीही नगरसेविका म्हणून विविध महत्त्वाच्या सामाजिक व नागरी प्रश्नांमध्ये सक्रिय सहभाग घेत नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेत ही जबाबदारी सोपविण्यात आल्याने माळशिरस परिसरातून त्यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button