
Talk18 मराठी l मंगळवार १५ सप्टेंबर :
चांदापुरी | प्रतिनिधी :
माळशिरस तालुक्यातील चांदापुरी येथील कै. दिलीप दत्तू सुळ यांच्या प्रथम पुण्यस्मरण (वर्षश्राद्ध) निमित्त बुधवार, दि. १६ सप्टेंबर २०२६ रोजी धार्मिक व श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
पुण्यस्मरणानिमित्त दुपारी १२.०५ वाजता फुलांचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी नातेवाईक, मित्रपरिवार, ग्रामस्थ व भाविकांनी उपस्थित राहून कै. दिलीप दत्तू सुळ यांना श्रद्धांजली अर्पण करावी, असे आवाहन समस्त सुळ परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
या निमित्ताने ह.भ.प. श्री. प्रकाश महाराज साठे, बीड यांची कीर्तन सेवा आयोजित करण्यात आली असून, त्यांचे फुलांचे कीर्तन सकाळी ९.३० ते दुपारी १२.०० वाजेपर्यंत होणार आहे.
हा कार्यक्रम चांदापुरी, ओंकार साखर कारखाना नजीक, सुळवस्ती, ता. माळशिरस, जि. सोलापूर येथे होणार आहे.
कै. दिलीप भाऊ दत्तू सुळ यांच्या स्मृतींना उजाळा देणाऱ्या या कार्यक्रमास परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सुळ परिवाराने केले आहे.


