Uncategorizedअकलूजदेश-विदेशमहाराष्ट्रविशेष

वेळापूर येथे उद्या वीज प्रश्नावर आक्रोश जनआंदोलन; आमदार उत्तमराव जानकर यांची उपस्थिती

वेळापूर | प्रतिनिधी

माळशिरस तालुक्यातील वाढत्या वीज समस्येविरोधात शुक्रवार, दिनांक २७ मार्च रोजी वेळापूर येथील महावितरण कार्यालयासमोर आक्रोश जनआंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

महावितरण कंपनीकडून सायंकाळी ६ ते रात्री १० या वेळेत करण्यात येणाऱ्या लोडशेडिंगमुळे तसेच वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे शेतकरी, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिक मोठ्या प्रमाणावर त्रस्त झाले आहेत. विशेषतः रात्रीच्या वेळेत वीज उपलब्ध नसल्यामुळे शेतीच्या कामांवर आणि व्यवसायावर गंभीर परिणाम होत असल्याचे चित्र आहे.

या पार्श्वभूमीवर वीजपुरवठा पूर्ववत सुरू करण्याची मागणी करत हे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. या आंदोलनाचे नेतृत्व माळशिरस तालुक्याचे आमदार मा. श्री. उत्तमराव जानकर हे करणार असून त्यांच्या प्रमुख उपस्थितीत आंदोलन पार पडणार आहे.

👉 स्थळ: महावितरण कार्यालय, वेळापूर (वेळापूर-माळशिरस रोड)
👉 दिनांक: शुक्रवार, २७ मार्च २०२६
👉 वेळ: सकाळी १० वाजता

या आंदोलनात तालुक्यातील सर्व नागरिक, शेतकरी, व्यापारी तसेच युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आंदोलनास पाठिंबा द्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button