Uncategorized

माळशिरस तालुका निवडणुकीसाठी सज्ज : ३,१८,२८१ मतदार मतदानाचा हक्क बजावणार

Talk18मराठी माळशिरस, दि. ५ (प्रतिनिधी) – माळशिरस तालुका येथे होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी प्रशासन सज्ज झाले असून, एकूण ३ लाख १८ हजार २८१ मतदार मतदानासाठी पात्र ठरले आहेत. यामध्ये १,५३,३१५ महिला, १,६४,९५० पुरुष तसेच १६ इतर मतदारांचा समावेश आहे.

तालुक्यातील निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी ३६३ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. प्रत्येक केंद्रावर आवश्यक यंत्रणा उपलब्ध करून देण्यात आली असून, मतदानासाठी लागणारी ३६३ मतदान यंत्रे दि. ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजता संबंधित केंद्रांकडे रवाना केली जाणार आहेत. त्याच दिवशी कर्मचाऱ्यांना तृतीय टप्प्याचे प्रशिक्षणही देण्यात येणार आहे.

निवडणुकीसाठी पी.आर.ओ. ३६३, एफ.पी.ओ. ३६३, ओ.पी.ओ. ७२६, शिपाई ३६३ व झेड कर्मचारी ३७ अशा एकूण १,८७२ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर एक पोलीस कर्मचारी किंवा होमगार्ड तैनात असणार आहे.

मतदानानंतर दि. ९ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता माळशिरस येथील शासकीय गोडाऊनमध्ये मतमोजणीला प्रारंभ होणार आहे. सुरुवातीला गट क्रमांक ३७ तसेच गण क्रमांक ७३ व ७४ यांची मतमोजणी होईल. एका गटातील दोन गणांची व त्यासोबत टपाली मतदानाची मोजणी एकाच वेळी केली जाणार आहे. त्यानंतर उर्वरित नऊ गटांची याच पद्धतीने क्रमवार मतमोजणी होईल.

मतमोजणीसाठी २४ टेबल्स असतील. टपाली मतदानासाठी स्वतंत्र कर्मचारी नेमण्यात आले असून, प्रत्येक टेबलवर एक सुपरवायझर, दोन सहाय्यक व एक शिपाई अशी रचना राहील. संपूर्ण मतमोजणी प्रक्रियेसाठी २०१ कर्मचारी कार्यरत राहणार आहेत.

ही माहिती प्रांत अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी विजया पांगारकर यांनी दिली. यावेळी तहसीलदार सुरेश शेजुळ उपस्थित होते.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केल्याने मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button