Uncategorizedअकलूजआरोग्यआर्थिकक्रीडादेश-विदेशमहाराष्ट्रविशेषशैक्षणिकसंपादकीयसामाजिक

शासकीय मुलांचे व मुलींच्या वस्तीगृहासंदर्भात आ. उत्तमराव जानकर यांची सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्यासोबत महत्त्वपूर्ण बैठक | Talk18 मराठी

मुंबई/माळशिरस Talk18 मराठी प्रतिनिधी l९ जुलै २०२६

माळशिरस तालुक्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नवबौद्ध समाजातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र मुलांचे व मुलींचे शासकीय वस्तीगृह उभारण्याच्या मागणीसंदर्भात मंत्रालयात सामाजिक न्याय मंत्री मा. ना. संजय शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

बैठकीला माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे आमदार उत्तमराव जानकर उपस्थित होते. त्यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी होणाऱ्या अडचणी, सुरक्षित निवासाची गरज आणि स्वतंत्र शासकीय वस्तीगृहाची आवश्यकता याबाबत सविस्तर मांडणी केली.

यावेळी आमदार जानकर यांनी माळशिरस शहरातील महिला व बालविकास विभागाच्या ताब्यात असलेली सरटिफाई हायस्कूल शेजारील शासकीय जागा मुलांचे व मुलींचे शासकीय वस्तीगृह उभारण्यासाठी उपलब्ध करून देण्याची मागणी केली.

या मागणीची दखल घेत सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना १५ दिवसांच्या आत जागा उपलब्ध करून देण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले. तसेच, हा विषय लवकर मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत स्वतंत्र बैठक घेऊन अंतिम निर्णय घेतला जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

बैठकीला महिला व बालविकास विभागाचे वरिष्ठ अधिकारी, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव, सचिव, समाजकल्याण आयुक्त, उपआयुक्त, सहाय्यक आयुक्त तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

माळशिरस तालुक्यातील विद्यार्थ्यांना दर्जेदार निवासी व शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आमदार उत्तमराव जानकर सातत्याने पाठपुरावा करत असून, या बैठकीमुळे शासकीय वस्तीगृह उभारणीच्या प्रक्रियेला महत्त्वाची गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button