Uncategorized

“श्री शंकर” सहकारी साखर कारखान्याकडून ऊस उत्पादकांना दिलासा

प्रथम ॲडव्हान्स ₹3025/- प्रति मे.टन अदा करण्यास सुरुवात

Talk18 मराठी / आण्णा भोसले :

सदाशिवनगर येथील श्री शंकर सहकारी साखर कारखाना लि. कडून सन 2025–26 च्या गळीत हंगामासाठी ऊस उत्पादकांना प्रथम ॲडव्हान्स देण्यास आज, 20 डिसेंबर 2025 पासून सुरुवात करण्यात आली आहे.दि. 16.11.2025 ते 30.11.2025 या कालावधीत गळीतास आलेल्या ऊसासाठी सभासद व ऊस उत्पादकांना ₹3025/- प्रति मे.टन प्रमाणे रक्कम अदा केली जात आहे, अशी माहिती कारखान्याचे व्हाईस चेअरमन मिलिंद कुलकर्णी यांनी दिली.कारखान्याचे मार्गदर्शक माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह शंकरराव मोहिते-पाटील, सहकार महर्षी कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील तसेच श्री शंकर कारखान्याचे चेअरमन आमदार रणजितसिंह विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या सूचनेनुसार सिझन 2025–26 साठी प्रथम ॲडव्हान्स दर ₹3025/- प्रति मे.टन निश्चित करण्यात आला आहे.यावेळी बोलताना ॲड. मिलिंद कुलकर्णी म्हणाले की, सभासद व ऊस उत्पादकांनी चेअरमन आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून चालू सिझनमध्ये कारखान्यास जास्तीत जास्त ऊस पुरवठा करावा. कारखाना व्यवस्थापन नेहमीच सभासद व ऊस उत्पादकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे कृतीतून दाखवून दिले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला ऊस श्री शंकर कारखान्याकडेच गाळपास पाठवावा, असे आवाहनही त्यांनी केले.

— Talk18 मराठी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button