Uncategorizedअकलूजआरोग्यआर्थिकक्रीडादेश-विदेशमहाराष्ट्रविशेषशैक्षणिकसंपादकीयसामाजिक

युद्ध संपले, मग गॅस सिलेंडरसाठी ४५ दिवसांची प्रतीक्षा का?राजकुमार हिवरकर-पाटील यांचा प्रशासनाला सवाल; महिलांच्या प्रश्नावर शिवसेना आक्रमक

माळशिरस l १ सप्टेंबर मंगळवार| प्रतिनिधी :

इराण-अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशात निर्माण झालेल्या गॅस टंचाईच्या काळात केंद्र सरकारने गॅस वितरणाबाबत काही निकष निश्चित केले होते. मात्र, युद्धाची परिस्थिती संपल्यानंतरही भारत पेट्रोलियम कंपनीकडून गॅस सिलेंडरच्या बुकिंगसाठी ४५ दिवसांची मुदत ठेवण्यात आल्याने नागरिकांसह विशेषतः महिला भगिनींमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

याच पार्श्वभूमीवर “गॅस सिलेंडरसाठी ४५ दिवसांची वाट पाहायची का?” असा सवाल उपस्थित करत महिलांच्या ज्वलंत प्रश्नासाठी शिवसेना मैदानात उतरली आहे. भारत पेट्रोलियम कंपनीकडून नियमबाह्य पद्धतीने होत असलेल्या गॅस पुरवठ्याबाबत जिल्हा पुरवठा अधिकारी सोलापूर यांचे लक्ष वेधण्यासाठी निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, इतर गॅस कंपन्यांनी सिलेंडर बुकिंगची मुदत २५ दिवसांवर आणली आहे. हिंदुस्थान पेट्रोलियमचा गॅस पुरवठाही २५ दिवसांनी होत असताना भारत पेट्रोलियमने अद्याप ४५ दिवसांची बुकिंगची मुदत कायम ठेवली आहे. त्यामुळे नागरिकांना, विशेषतः महिलांना मोठ्या संघर्षाला सामोरे जावे लागत आहे.

गॅस सिलेंडर हा प्रत्येक कुटुंबाच्या दैनंदिन जीवनातील अत्यावश्यक घटक आहे. त्यामुळे बुकिंगसाठी ४५ दिवसांची प्रतीक्षा करावी लागणे ही बाब नागरिकांना वेठीस धरणारी असून, यामुळे महिला भगिनींमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. युद्धाची परिस्थिती संपलेली असतानाही गॅस टंचाईचा अनुभव संपलेला नसल्याने प्रशासनाने या प्रश्नाची तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी शिवसेनेचे सोलापूर जिल्हा प्रमुख राजकुमार हिवरकर पाटील,ओबीसी महासंघाचे प्रदेश उपप्रमुख तानाजीराव साठे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख तानाजीराव भोळे पाटील, तालुकाप्रमुख शहाजी काळे, पश्चिम महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष एन. के. साळवे, माळशिरस शहर संघटक पोरे भाऊ, विद्यार्थी सेनेचे प्रमुख शिवदत्त भोळे पाटील, दहेगाव शहर प्रमुख दत्ता बोडरे आदी उपस्थित होते.

“लाडक्या बहिणींच्या रोजच्या संघर्षासाठी शिवसेना मैदानात” असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button