महाराष्ट्र

चांदापुरीचे सरपंच जयवंत अण्णा सूळ यांच्या मातोश्रींचे निधन; काल अंत्यसंस्कार संपन्न

Talk18 मराठी प्रतिनिधी :

चांदापुरी (ता. माळशिरस) – येथील लोकनियुक्त सरपंच जयवंत अण्णा सूळ यांच्या मातोश्री श्रीमती पुतळाबाई दत्तू सूळ यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने चांदापुरी गावासह परिसरात शोककळा पसरली आहे.

पुतळाबाई सूळ या शांत, संयमी व कष्टाळू स्वभावाच्या होत्या. त्यांनी आयुष्यभर कुटुंब एकत्र ठेवण्याचे आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्य केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सूळ कुटुंब सामाजिक व सार्वजनिक क्षेत्रात कार्यरत राहिले.

त्यांच्या पश्चात –
▪️ एकूण ८ मुले (त्यापैकी २ मुलांचे पूर्वी निधन झालेले आहे)
▪️ ८ सुना
▪️ २ मुली
▪️ मुलांकडील १३ नातू व ७ नाती
▪️ मुलीकडील ४ नातू व ३ नाती
असा मोठा परिवार आहे.

त्यांचा अंत्यविधी काल दुपारी सुळवस्ती, चांदापुरी येथे शोकाकुल वातावरणात पार पडला. यावेळी नातेवाईक, ग्रामस्थ व विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो, हीच भावपूर्ण श्रद्धांजली.

— Talk18 मराठी

शोकवार्ता #चांदापुरी #जयवंतअण्णासूळ #श्रद्धांजली #Talk18मराठी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button