
16 ऑक्टोंबर l शुक्रवार
Talk18 मराठी निमगाव म प्रतिनिधी : राष्ट्रीय काँग्रेस कमिटीच्या माळशिरस तालुकाध्यक्षपदी अॅड. पृथ्वीराज पाटील यांची निवड झाल्याबद्दल काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब नेते यांच्या निवासस्थानी त्यांचा सन्मान करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
अॅड. पृथ्वीराज पाटील यांची तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याने काँग्रेस संघटनेत नव्या नेतृत्वाला संधी मिळाली आहे. त्यांच्या माध्यमातून माळशिरस तालुक्यात पक्षसंघटनेला अधिक बळकटी मिळेल, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

या प्रसंगी कृषीभूषण जगन्नाथ मगर, जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर मगर, ज्येष्ठ पत्रकार भारततात्या मगर, सुधीरभाऊ साठे, जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ गायकवाड, देवदत्त मगर, अभिजित मगर, शिवाजी मगर तसेच पत्रकार अण्णा भोसले आदी उपस्थित होते.
नूतन तालुकाध्यक्ष अॅड. पृथ्वीराज पाटील यांचा सन्मान करून उपस्थित मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.



