
Talk18 मराठी अकलूज : प्रतिनिधी
सध्या सोशल मीडियाच्या आणि आकर्षक सेलिब्रेशनच्या युगात वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. विशेषतः लहान मुलांच्या पहिल्या वाढदिवसाला खास महत्त्व दिले जाते. याच पार्श्वभूमीवर अकलूज येथील श्रीनाथ आर्ट यांनी मुलीच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त एक आगळीवेगळी आणि कौतुकास्पद ऑफर जाहीर केली आहे.
“मुलीच्या पहिल्या वाढदिवसाचा बॅनर प्रिंटिंग अगदी मोफत” अशी घोषणा करण्यात आली असून, या उपक्रमामुळे पालकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. आकर्षक डिझाईन, रंगीत सजावट आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने वाढदिवसाचे बॅनर तयार करून दिले जाणार असल्याची माहिती संबंधितांकडून देण्यात आली.
समाजात मुलींबद्दल सकारात्मक संदेश देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. “मुलगी ही घराची शान आहे” हा संदेश या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
अकलूज परिसरातील नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत केले असून, अनेकांनी याला सामाजिक बांधिलकी जपणारा स्तुत्य उपक्रम असे म्हटले आहे.
संपर्क :श्रीनाथ आर्ट, अकलूज
मो. ८७९१८२०५६५ / ९९६०००१६००


