Uncategorizedअकलूजमहाराष्ट्रविशेषशैक्षणिक

माळशिरसच्या कर्तृत्ववान अधिकाऱ्याचा राज्यस्तरीय सन्मान — आस्मा आतार यांना ‘फातिमा शेख’ पुरस्काराने गौरव

नातेपुते Talk18 मराठी (प्रतिनिधी) : माळशिरस तालुक्याच्या महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी (सीडीपीओ) आस्मा कमाल आतार यांनी आपल्या कर्तृत्व, प्रामाणिकपणा आणि समाजाभिमुख कार्याच्या जोरावर राज्य पातळीवर मानाचा तुरा रोवला आहे. पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चॅनेलतर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘फातिमा शेख आदर्श अधिकारी’ राज्यस्तरीय पुरस्काराने त्यांना मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या ९व्या वर्धापन दिनानिमित्त विविध मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आले करण्यात आला होता.

यावेळी विधान परिषदेचे माजी आमदार रामहरी रुपनर, ॲड. राहुल वाघमोडे, एनडीएमजेचे राज्याचे केवल उके, गटशिक्षणाधिकारी सुषमा महामुनी, प्रकल्प अधिकारी आसमा आतार, रिपाई नेते नंदकुमार केंगार, एन के साळवे, शिवसेनेचे राजकुमार हिवरकर, रिपाईचे तालुकाध्यक्ष मिलिंद सरतापे, विकासदादा धाईंजे,’वैभव गीते विशाल साळवे, पंचायत समिती सदस्य मधुकर वाघमोडे, पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चॅनलचे संपादक प्रमोद शिंदे,उपसंपादक प्रशांत खरात यांच्यासह शिक्षक अंगणवाडी सेविका विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आस्मा आतार यांनी बाल विकास प्रकल्प अधिकारी म्हणून कार्य करताना केवळ शासकीय जबाबदाऱ्या पार पाडल्या नाहीत, तर त्या जबाबदाऱ्यांना सामाजिक बांधिलकीची जोड देत अनेक नाविन्यपूर्ण आणि प्रभावी उपक्रम राबवले. अंगणवाडी व्यवस्थेचे बळकटीकरण, महिला सक्षमीकरण, बालकांच्या पोषण व आरोग्यविषयक योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि तळागाळातील कुटुंबांपर्यंत शासनाच्या योजना पोहोचवण्याचे त्यांचे काम हे खऱ्या अर्थाने प्रेरणादायी ठरले आहे.

त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक अंगणवाडी केंद्रांनी दर्जेदार कामगिरी करत नवे मापदंड निर्माण केले. समाजातील दुर्बल, वंचित आणि गरजू घटकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांच्या जिद्दी, चिकाटी, अथक परिश्रम आणि कर्तव्यदक्षतेमुळे असंख्य कुटुंबांच्या जीवनाला नवी दिशा मिळाली आहे.

या सन्मानाबद्दल प्रतिक्रिया देताना आस्मा आतार म्हणाल्या,
“हा पुरस्कार माझ्यासाठी केवळ सन्मान नाही, तर माझ्या कामाची मोठी जबाबदारी आहे. हा सन्मान मी माळशिरस तालुक्यातील सर्व अंगणवाडी सेविकांना समर्पित करते. त्यांच्या सहकार्याशिवाय हे शक्य झाले नसते. पुढील काळात अधिक संवेदनशीलतेने, अधिक जोमाने आणि सातत्याने समाजहिताचे कार्य करत राहणार आहे.”

या गौरवामुळे माळशिरस तालुक्याचे नाव राज्याच्या पातळीवर उज्ज्वल झाले असून, त्यांच्या कार्यातून प्रशासनात कार्यरत असलेल्या अनेकांना प्रेरणा मिळणार आहे. आस्मा आतार यांचा हा यशस्वी प्रवास केवळ एका अधिकाऱ्याचा सन्मान नसून, समाजसेवेच्या मूल्यांचा आणि कर्तव्यनिष्ठेचा गौरव असल्याची भावना सर्व स्तरातून व्यक्त होत आहे.

यावेळी सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button