अकलूज येथील निवृत्त शिक्षक अय्यूब सय्यद (गुरुजी) यांचे निधन

Talk18 मराठी अकलूज प्रतिनिधी :
अकलूज (प्रतिनिधी) – येथील सेवानीवृत्त जिल्हा परिषद शिक्षक अय्यूब बुडण सय्यद (गुरुजी) यांचे वृद्धापकाळाने आकस्मिक निधन झाले. निधनसमयी त्यांचे वय ९२ वर्षे होते. त्यांच्या निधनाने अकलूज परिसरात शोककळा पसरली आहे.
अय्यूब सय्यद यांनी आपल्या शिक्षक सेवाकाळात अनेक विद्यार्थ्यांना घडवून समाजाला सुजाण नागरिक दिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेल्या विद्यार्थ्यांमध्ये राज्याचे माजी सहकार राज्यमंत्री कै.प्रतापसिंह मोहिते पाटील, उद्योग महर्षी कै. उदयसिंह मोहिते पाटील, अँड. नितीन खराडे, आमदार रोहित पवार यांचे वडील राजेंद्र दादा पवार (बारामती), या सारख्या मान्यवरांचा समावेश आहे.
त्यांच्या पश्चात तीन मुली, दोन मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. ते सामाजिक कार्यकर्ते अमजद सय्यद यांचे वडील, सामाजिक कार्यकर्ते साजिदभाई सय्यद यांचे चुलते तसेच लोकनेते प्रतिष्ठानचे अध्यक्ष जुल्करभाई शेख यांचे ते काका होते.
त्यांचा अंत्यविधी सोमवार, दि. २५ एप्रिल रोजी सायंकाळी ५:३० वाजता अकलूज येथील माळीनगर रोडवरील दफनभूमीत संपन्न होणार आहे.
Talk18 मराठी परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली.


