अकलूजमहाराष्ट्रविशेष
निकमवाडी- खुडूस येतील दादासाहेब पांडुरंग माने (मिस्त्री) यांचे वयाच्या ७४ वर्षी दुःखद निधन

Talk18 मराठी प्रतिनिधी :
खुडूस (ता. माळशिरस) येथील ज्येष्ठ नागरिक दादासाहेब पांडुरंग माने (मिस्त्री) यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले.
माने यांनी सन १९७२ मध्ये पाटबंधारे विभागात नोकरीस सुरुवात केली होती. सेवाकाळात त्यांनी प्रामाणिकपणे काम बजावत आपली वेगळी ओळख निर्माण केली. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी प्रगतशील बागायतदार म्हणूनही आपली ओळख निर्माण केली.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे. ते हरिभाऊ माने व आगतराव (बापू) माने यांचे वडील होत.
त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अंत्यविधी सकाळी १०.३० वाजता त्यांच्या राहत्या घरी होणार असून तिसरा (सावडणे) कार्यक्रम रविवार दिनांक २६ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ७ वाजता होणार आहे.


