Uncategorizedमहाराष्ट्रविशेषशैक्षणिकसंपादकीयसामाजिक

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा कुर्डुवाडीत भव्य नागरी सत्कार; कार्यकर्त्यांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन

Talk18 मराठी | आण्णा भोसले

सोलापूर जिल्ह्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या वतीने केंद्रीय समाजकल्याण मंत्री तथा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या राज्यसभेवर तिसऱ्यांदा निवडीबद्दल भव्य नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम कुर्डुवाडी शहर व माढा तालुकावासीयांच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे.

या सत्कार सोहळ्याला महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे, प्रदेश सचिव सुनील सर्वगोड तसेच प्रदेश उपाध्यक्ष बापुसाहेब जगताप यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

हा कार्यक्रम मंगळवार, दि. ५ मे रोजी सायंकाळी ६ वाजता कुर्डुवाडी येथील तुळजाई लॉन्स येथे पार पडणार असून, जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष सोमनाथ भोसले व जिल्हा सरचिटणीस शामसुंदर (रवी) गायकवाड यांनी केले आहे.

हा सत्कार सोहळा पक्षासाठी तसेच कार्यकर्त्यांसाठी उत्साहवर्धक ठरणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.

या सत्कार समारंभासाठी रिपब्लिकन पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button